BCCI Dainik Gomantak
क्रीडा

एशियन गेम्स, इम्पॅक्ट प्लेअर अन् स्टेडियम सुधारणा..., BCCI च्या बैठकीत झाले 5 महत्त्वाचे निर्णय

BCCI Meeting: शुक्रवारी बीसीसीआयची बैठक झाली असून 5 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Pranali Kodre

BCCI Apex Council Meeting Key Decisions: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सर्वोच्च परिषेदेची बैठक शुक्रवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. आगामी एशियन गेम्स, देशांतर्गत स्पर्धा आणि वर्ल्डकप २०२३ च्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण बैठक होती.

या बैठकीत वर्ल्डकप सामने खेळवण्यात येणाऱ्या स्टेडियमबद्दल, तसेच इम्पॅक्ट प्लेअर नियम, एशियन गेम्समधील सहभाग अशा अनेक गोष्टींबद्दल चर्चा झाली. या बैठकीत झालेल्या ५ महत्त्वाच्या निर्णयांबद्दल जाणून घेऊ.

बीसीसीआयचे महत्त्वाचे निर्णय

  • 1. बीसीसीआय भारतीय खेळाडूंसाठी, ज्यात निवृत्त खेळाडूंचाही समावेश आहे, त्यांच्यासाठी परदेशी टी20 लीगमधील सहभागाबाबत पुढील योजना तयार करणार आहे.

  • 2. बीसीसीआयने भारताच्या महिला आणि पुरुष दोन्ही संघांच्या सहभागासाठी मंजूरी दिली आहे. त्यामुळे यंदा सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या एशियन गेम्समध्ये भारतीय क्रिकेट संघ खेळताना दिसणार आहेत.

    तसेच एशियन गेम्स आणि वर्ल्डकप 2023 या स्पर्धांचा कालावधी साधारण एकत्र आल्याने बीसीसीआय ज्या खेळाडूंना वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळणार नाही, अशा काही खेळाडूंना एशियन गेम्ससाठी भारतीय संघात संधी देणार आहे.

  • 3. बीसीसीआयने गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही आगामी सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेअरच्या संकल्पनेला मंजूरी दिली आहे. पण इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमात दोन बदल करण्यात आले आहेत.

    पहिला बदल म्हणजे संघांना नाणेफेकीपूर्वी 4 राखीव खेळाडूंसह अंतिम 11 जणांचा संघ निवडावा लागणार आहे. तसेच दुसरा बदल म्हणजे संघ सामन्यादरम्यान कधीही इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करू शकतात. यापूर्वी गेल्यावर्षी संघ केवळ 14 षटकांच्या आतच इम्पॅक्ट प्लेअर वापरू शकत होते.

  • 4. फलंदाजी आणि गोलंदाजी यांच्यातील समन्वय साधण्यासाठी 16 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत बीसीसीआयने प्रत्येक षटकात दोन बाऊंसरची परवानगी देण्याचे ठरवले आहे.

  • 5. बीसीसीआयने वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने देशातील स्टेडियममध्ये आणखी सुधारणा करण्याचे ठरवले आहे. या सुधारणा दोन टप्प्यात केल्या जाणार आहेत.

    पहिल्या टप्प्यात वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सामने ज्या स्टेडियमवर होणार आहेत, त्या स्टेडियममधील सुधारणा केल्या जाणार आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यात उर्वरित सर्व स्टेडियममध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT