India Test Team  Dainik Gomantak
क्रीडा

WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा! अजिंक्य रहाणेचं कमबॅक, तर सूर्या आऊट

कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी BCCI ने 15 जणांच्या टीम इंडियाची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

Team India for WTC Final: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात 15 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारताला हा सामना 7 ते 11 जून दरम्यान पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळायचा आहे.

बीसीसीआयने घोषित केलेल्या या भारतीय संघात अनुभवी अजिंक्य रहाणेचे पुनरागमन झाले आहे. मात्र, सूर्यकुमार यादवला कसोटीतील स्थान गमवावे लागले आहे. रहाणेने याआधी भारताकडून अखेरचा सामना जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.

त्यानंतर रहाणेला खराब फॉर्ममुळे भारतीय संघातून वगळण्यात आले होते. तसेच काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने जाहीर केलेल्या वार्षिक करारातूनही रहाणेला वगळण्यात आले होते. पण रहाणेने गेल्या वर्षभरात देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीनंतर आता त्याला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

रहाणे रणजी ट्रॉफी 2022-23 मध्ये मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, तसेच सध्या आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्सकडून शानदार कामगिरी करत आहे. तो आयपीएल 2023 मध्ये आत्तापर्यंत 5 सामने खेळला असून 52.25 च्या सरासरीने आणि 199.04 च्या स्ट्राईक रेटने 209 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

दरम्यान, कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात मोठे बदल झालेले नाही. रोहित शर्मा भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळणार असून संघात शुभमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल असे फलंदाज आहेत.

त्याचबरोबर आर अश्विन, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे फिरकी गोलंदाजीबरोबरच अष्टपैलू खेळाडूंची भूमिकाही निभावताना दिसतील. वेगवान गोलंदाजीसाठी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, शार्दुल ठाकूर आणि जयदेव उनाडकट असे पर्याय आहेत. केएस भरत यष्टीरक्षक असेल.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की सध्या जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे दोघेही दुखापतीतून सावरत असल्याने या सामन्यासाठी उपलब्ध नाहीत.

कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना लंडनमधील द ओव्हल मैदानावर पार पडणार आहे. तसेच 12 जून हा या सामन्यासाठी राखीव दिवसही असणार आहे.

असा आहे भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT