Batista latest statement on WWE return Dainik Gomantak
क्रीडा

6 वेळचा WWE चॅम्पियन बटिस्टा कमबॅक करणार? स्पष्ट शब्दांत म्हणाला, 'आता रिंगमध्ये...'; Watch Video

Batista Retirement: व्यावसायिक कुस्तीच्या जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा आणि सहा वेळा WWE विश्वविजेतेपद पटकावणारा दिग्गज सुपरस्टार बटिस्टा (डेव्ह बॉटिस्टा) याने आपल्या चाहत्यांना मोठा धक्का देणारी घोषणा केली आहे.

Sameer Amunekar

व्यावसायिक कुस्तीच्या जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा आणि सहा वेळा WWE विश्वविजेतेपद पटकावणारा दिग्गज सुपरस्टार बटिस्टा (डेव्ह बॉटिस्टा) याने आपल्या चाहत्यांना मोठा धक्का देणारी घोषणा केली आहे. अनेक वर्षांपासून त्याच्या पुनरागमनाची चर्चा रंगत असताना, आता स्वतः बटिस्टानेच आपण पुन्हा कधीही व्यावसायिक कुस्तीच्या रिंगमध्ये उतरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 57 वर्षीय बटिस्टाच्या या वक्तव्यानंतर WWE विश्वात मोठी चर्चा सुरू झाली असून, त्याच्या पुनरागमनाची आशा बाळगणाऱ्या चाहत्यांची निराशा झाली आहे.

'माझ्या कारकिर्दीचा शेवट सुंदर झाला, तो बदलायचा नाही'

अलीकडेच एका यूट्यूब मुलाखतीत बटिस्टाला निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्याने अनेक माजी रेसलर्स निवृत्तीनंतर पुन्हा रिंगमध्ये परतल्याचे सांगितले. मात्र स्वतःचा निर्णय वेगळा असल्याचे स्पष्ट करत, आपल्या कारकिर्दीचा शेवट ज्या पद्धतीने झाला तो कायम तसाच राहावा, अशी इच्छा व्यक्त केली.

त्याच्या मते, अनेकजण निवृत्तीनंतर पुन्हा पुनरागमन करतात, त्यामुळे निवृत्ती ही औपचारिकता वाटू लागते. पण आपण हा मार्ग स्वीकारणार नसून, पुन्हा रिंगमध्ये उतरण्यापेक्षा इतर कोणतेही काम करणे पसंत करू, असे त्याने स्पष्ट केले.

WWE मधील दमदार कारकीर्द

बटिस्टाने WWE मध्ये पदार्पण केल्यानंतर अल्पावधीतच आपल्या ताकदवान शैलीमुळे लोकप्रियता मिळवली. त्यानंतर तो प्रसिद्ध Evolution गटाचा सदस्य बनला. या गटात ट्रिपल एच, रिक फ्लेअर आणि रँडी ऑर्टन यांसारखे दिग्गज सुपरस्टार होते.

2005 मध्ये रॉयल रंबल स्पर्धा जिंकून त्याने मुख्य स्पर्धक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यानंतर त्याने अनेक वेळा WWE विश्वविजेतेपदावर नाव कोरले आणि कंपनीतील सर्वात प्रभावशाली सुपरस्टारपैकी एक म्हणून स्थान मिळवले.

हॉलिवूडमध्येही मिळवले यश

WWE मधील यशानंतर बटिस्टाने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्याने अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या असून, अॅक्शन आणि सुपरहिरो चित्रपटांमधील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यामुळे तो केवळ रेसलिंगपुरताच मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय अभिनेता म्हणूनही ओळखला जाऊ लागला.

रेसलमेनिया 35 ठरला अखेरचा सामना

बटिस्टाचा शेवटचा WWE सामना रेसलमेनिया 35 मध्ये ट्रिपल एचविरुद्ध झाला होता. त्या लढतीत त्याला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर तो पुन्हा कधीही WWE च्या रिंगमध्ये दिसला नाही. मात्र, वेळोवेळी त्याच्या पुनरागमनाच्या अफवा समोर येत राहिल्या. आता स्वतः बटिस्टानेच या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

बटिस्टाच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी त्याच्या संस्मरणीय कारकिर्दीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तर काही चाहत्यांनी त्याला अखेरच्या एका सामन्यात पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, बतिस्ताने आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केल्याने त्याच्या WWE पुनरागमनाची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

Teacher Transfer Protest: 'आम्हाला हे शिक्षक यावर्षी तरी हवेत'; पेडणेतील विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार, जोरदार निदर्शने

SCROLL FOR NEXT