ISL football Dainik gomantak
क्रीडा

हैदराबादच्या धडाक्यात ओगबेचेची विक्रमी कामगिरी

नायजेरियन खेळाडूचे आयएसएलमध्ये सर्वाधिक 49 गोल; नॉर्थईस्ट युनायटेडला 5-0 फरकाने हरविले

दैनिक गोमन्तक

पणजी : नायजेरियन स्‍ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे याने सोमवारी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (football) स्पर्धेत सर्वाधिक 49 गोल नोंदविण्याचा विक्रम नोंदवला. त्याच्या दोन गोलच्या बळावर हैदराबाद एफसीने नॉर्थईस्ट युनायटेडचा 5-0 फरकाने धुव्वा उडवून स्पर्धेच्या आठव्या मोसमात अग्रस्थान बळकट केले. सामना फातोर्डा (Fatorda) येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.

37 वर्षीय बार्थोलोम्यू ओगबेचे याने 2018-19 मोसमात नॉर्थईस्ट युनायटेडतर्फे आयएसएल स्पर्धेत पदार्पण केले होते, सोमवारी आपल्या जुन्या संघाविरुद्ध दोन गोल नोंदवून त्याने विक्रमी कामगिरी साकारली. त्याने प्रत्येकी 48 गोल केलेल्या स्पॅनिश फेरान कोरोमिनास व भारतीय सुनील छेत्री यांना मागे टाकले. ओगबेचे 2018 ते 2022 या कालावधीत एकंदरीत 70 आयएसएल सामने खेळला आहे.

यंदा तो गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर असून त्याने 13 सामन्यांत 14 गोल केले आहेत. आयएसएल स्पर्धेत त्याने आतापर्यंत नॉर्थईस्ट युनायटेड, केरळा ब्लास्टर्स, मुंबई सिटी व आता हैदराबाद अशा चार संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

हैदराबादच्या (Hyderabad) एकतर्फी विजयात ओगबेचे याने अनुक्रमे तिसऱ्या व 60व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. याशिवाय आकाश मिश्रा याने 45+2 व्या मिनिटास, निखिल पुजारी याने 84 व्या मिनिटास व बदली खेळाडू स्पॅनिश एदू गार्सिया याने 88 व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल नोंदवून योगदान दिले. नॉर्थईस्टच्या व्ही. सुहेर याने 71 व्या मिनिटास पिछाडी कमी केली होती, पण रेफरीने सहाय्यक रेफरीशी सल्लामसलत करून हा गोल अवैध ठरविला. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातही हैदराबादने नॉर्थईस्टचा 5-1 फरकाने फडशा पाडला होता.

मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबादचा हा 14 लढतीतील सातवा विजय आहे. त्यांचे आता सर्वाधिक 26 गुण झाले असून दुसऱ्या क्रमांकावरील जमशेदपूरवर चार गुणांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. खालिद जमिल यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्ट युनायटेडला नववा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 15 लढतीनंतर त्यांचे 10 गुण आणि दहावा क्रमांक कायम राहिला. स्पर्धेत आता हैदराबादने सर्वाधिक 33 गोल केले असून नॉर्थईस्टवर सर्वांत जास्त 33 गोल स्वीकारण्याची नामुष्की आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT