Bangladesh Team ICC
क्रीडा

BAN vs NZ, 1st Test: बांगलादेशचा न्यूझीलंडला पराभवाचा धक्का! 10 विकेट्स घेत तैजुल इस्लाम विजयाचा हिरो

Bangladesh vs New Zealand: पहिल्या कसोटीत बांगलादेशने न्यूझीलंडला पराभवाचा धक्का दिला असल्याने नजमुल हुसैन शांतोच्या नेतृत्वाची सुरुवातही विजयाने झाली.

Pranali Kodre

Bangladesh won 1st Test by 150 runs against New Zealand at Sylhet:

बांगलादेशने शनिवारी मोठा पराक्रम केला आहे. बांगलादेशने न्यूझीलंडला सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का दिला आहे. बांगलादेशने 150 धावांनी हा कसोटी सामना जिंकत 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

बांगलादेशच्या या विजयाचा हिरो तैजुल इस्लाम ठरला आहे. त्याने या सामन्यात १० विकेट्स घेतल्या. याशिवाय नजमुल हुसैन शांतोसाठी हा कर्णधार म्हणून पहिला सामना होता, त्यामुळे त्याच्या नेतृत्वाची सुरुवातही विजयाने झाली. दरम्यान, बांगलादेशचा हा मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध मिळवलेला पहिलाच विजय ठरला आहे.

या सामन्याला 28 नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली होती. बांगलादेशने दुसऱ्या डावात न्यूझीलंडसमोर 332 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा दुसरा डाव सामन्याच्या पाचव्या दिवशी 71.1 षटकात 181 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे बांगलादेशने विजयावर शिक्कामोर्तब केले.

न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात डॅरिल मिचेलने सर्वाधिक 58 धावा केल्या. तसेच टीम साऊदीनेही 34 धावांची झुंज दिली. मात्र बाकी कोणाला खास काही करता आले नाही. तैजुल इस्लामने न्यूझीलंडच्या फलंदाजांना धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्याने केन विलियम्सन (11), डेवॉन कॉनवे (22) यांच्या महत्त्वाच्या विकेट्सही घेतल्या.

या डावात तैजुलने 75 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त नाईम हसनने 2 विकेट्स घेतल्या, तर शोरिफूल इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बांगलादेश प्रथम फलंदाजीसाठी उतरले. बांगलादेशने पहिल्या डावात 85.1 षटकात सर्वबाद 310 धावा केल्या.

बांगलादेशकडून मेहमुदुल हसन जॉयने 86 धावांची खेळी केली. तसेच नजमुल हुसैन शांतो आणि मोमिनूल हक यांनी प्रत्येकी 37 धावांची खेळी केली. याशिवाय अन्य फलंदाजांनी छोटेखानी खेळी करत धावसंख्येत भर टाकली. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात 101.5 षटकात सर्वबाद 317 धावा केल्या आणि 7 धावांची आघाडी मिळवली. या डावात न्यूझीलंडकडून केन विलियम्सनने 104 धावांची शतकी खेळी केली. तसेच डॅरिल मिचेलने 41 धावांची आणि ग्लेन फिलिप्सने 42 धावांची खेळी केली.याशिवाय कर्णधार टीम साऊदीने 35 धावा केल्या. बांगलादेशकडून तैजुलने 4 विकेट्स घेतल्या.

यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना बांगलादेशने 100.4 षटकात 338 धावा उभारल्या. दरम्यान, पहिल्या डावातील 7 धावांच्या पिछाडीमुळे बांगलादेशने न्यूझीलंडसमोर 332 धावांचे आव्हान ठेवले होते.

दरम्यान, बांगलादेशकडून दुसऱ्या डावात कर्णधार शांतोने 105 धावांची शतकी खेळी केली. तसेच मुशफिकूर रहिमने 67 धावांची, मेहदी हसन मिराजने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली, तर मोमीनुल हकने 40 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून या डावात एजाज पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT