Tamim Iqbal  Dainik Gomantak
क्रीडा

Bangladesh Premier League suspended: नुकसान, फिक्सिंग अन् भ्रष्टाचार! बांगलादेश प्रीमियर लीगला लागलं टाळं; 31 कोटींचा तोटा सहन करत क्रिकेट बोर्डानं फिरवली पाठ

Tamim Iqbal BCB President BPL Announcement: 2012 पासून सुरु असलेल्या बांगलादेश प्रीमियर लीगला आता ब्रेक लागला असून, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला.

Manish Jadhav

Bangladesh Premier League Suspended: 2012 पासून सुरु असलेल्या बांगलादेश प्रीमियर लीगला आता ब्रेक लागला असून, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला. बीसीबीचे अध्यक्ष तमीम इक्बाल यांनी आपल्या भविष्यातील योजना स्पष्ट करताना यंदा बीपीएल खेळवली जाणार नसल्याची अधिकृत घोषणा केली. स्पर्धा सध्या प्रचंड तोट्यात चालल्याने आणि अनेक फ्रँचायझींना लीगचे नियम व अटी पाळण्यात अपयश येत असल्याने क्रिकेट बोर्डाने हे अत्यंत कडक पाऊल उचलले.

आर्थिक संकटाची माहिती देताना तमीम इक्बाल यांनी सांगितले की, गेल्या दोन हंगामांत बीपीएलमुळे बांगलादेश (Bangladesh) क्रिकेट बोर्डाला 3.3 दशलक्ष डॉलर (सुमारे 31 कोटी रुपये) पेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले. फ्रेंचायझी क्रिकेटमधून बोर्डाचा फायदा झाला पाहिजे, तोटा नाही, या स्पष्ट भूमिकेसह जोपर्यंत परिस्थिती पूर्णपणे पूर्ववत होत नाही आणि नवी नियमावली तयार होत नाही, तोपर्यंत बीपीएल आयोजित करणे फायदेशीर ठरणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

केवळ आर्थिक तंगीच नाही तर गेल्या काही महिन्यांत बीपीएलला फिक्सिंग, बेटिंग आणि अंतर्गत वादांचे मोठे ग्रहण लागले. मे महिन्यात बेटिंगच्या आरोपावरुन एका खेळाडूसह अनेक मॅच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले, तर मागील हंगामात बोर्ड अधिकाऱ्यांच्या विधानांवर नाराज होऊन खेळाडूंनी सामन्यांवर बहिष्कार टाकल्याच्या घटना घडल्या. आता या सर्व त्रुटी दूर करुन, नव्या आणि कडक नियमांसह पुढच्या वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात नवीन फ्रँचायझी निवडीची प्रक्रिया पार पाडून बीपीएलला पुन्हा नव्या रुपात सादर करण्याची योजना क्रिकेट बोर्डाने आखली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT