India vs Bangladesh: Dainik Gomantak
क्रीडा

India vs Bangladesh: मिराज, रेहमानने हिरावला भारताचा विजय; दहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

पहिल्या वनडेत भारताचा पराभव; कुलदीप सेनचे पदार्पणाच्या सामन्यात एका षटकात दोन बळी

Akshay Nirmale

India vs Bangladesh: मेहदी हसन मिराज आणि मुस्तफिजुर रेहमान या जोडीने शेवटच्या गड्यासाठी केलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर बांग्लादेशने भारताविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात 4 ओव्हर राखून विजय मिळवला. या विजयाने बांग्लादेशने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील पुढचा सामना बुधवारी 7 डिसेंबर तर अखेरचा सामना शनिवारी 10 डिसेंबर रोजी होणार आहे.

(India vs Bangladesh ODI series)

भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली. पहिला सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला गेला. भारताचे 187 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बांग्लादेशला पहिल्याच चेंडूवर दीपक चहर नजमुल हुसेन शांतोला पॅव्हेलियनमध्ये पाठवत धक्का दिला. रोहित शर्माने स्लिपमध्ये त्याचा झेल टिपला. त्यानंतर 26 धावा झालेल्या असताना मोहम्मद सिराज्चाय चेंडुवर इनामूल हक 14 धावांवर बाद झाला. 74 धावांच्या स्कोअरवर बांगलादेशची तिसरी विकेट पडली.

कर्णधार लिटन दास 63 चेंडूत 41 धावा करून बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरने त्याला झेलबाद केले. तर 95 धावांवर बांगलादेशची चौथी विकेट पडली. शाकिब अल हसन 38 चेंडूत 29 धावा करून बाद झाला. विराट कोहलीने शानदार झेल घेत शाकिबला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. महमुदुल्लाला 35 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकूरने पायचित केले. तर 36 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सिराजने मुशफिकर रहीमला बोल्ड केले.

39 व्या षटकात बांगलादेशला दोन धक्के बसले. कुलदीप सेनने आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात एका षटकात दोन बळी घेतले. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने अफिफ हुसैनला मोहम्मद सिराजकरवी झेलबाद केले. यानंतर पाचव्या चेंडूवर इबादत हुसेनची विकेट पडली. त्यानंतर बांगलादेशला 136 धावांवर नववा धक्का बसला. सिराजने 40 व्या षटकात हसन महमूदला शुन्यावर पायचित केले. त्यानंतर मेहदी हसन मिराज आणि मुस्तफिजुर रेहमान यांनी दहाव्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचत बांग्लादेशचा विजय साकारला.

तत्पुर्वी भारताचा डाव 41.2 षटकांत 186 धावांतच संपुष्टात आला. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय प्रथम दर्शनी बांगलादेशने योग्य ठरवला. भारताने 11 षटकांच्या आतच पहिल्या तीन विकेट्स गमावल्या होत्या.

पण नंतर केएल राहुलने श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदरच्या मदतीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रेयस (24) आणि सुंदर (19) दोघेही खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर बाद झाले. केएल आणि श्रेयस यांच्यात 43 धावांची चौथ्या विकेटसाठी भागीदारी झालेली. तसेच केएल आणि सुंदरमध्ये पाचव्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी झाली.

मात्र, या दोन भागीदाऱ्या तुटल्यानंतर भारताने झटपट विकेट्स गमावल्या. पण, एका बाजूने केएल राहुलने 73 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. त्यामुळे भारताला 186 धावांपर्यंत पोहचता आले. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा (27) आणि श्रेयस अय्यर (24) यांनाच 20 धावांचा टप्पा पार करता आला. याशिवाय कोणताही भारतीय फलंदाज कमाल दाखवू शकला नाही. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने 5 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने विराट कोहली (9) आणि रोहित शर्मा यांना एकाच षटकात बाद केले. तसेच इबादत हुसैनने 4 विकेट्स घेतल्या. तर मेहदी हसनने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT