Football Tournament Dainik Gomantak
क्रीडा

छेत्रीच्या गोलमुळे बंगळूरचा विजयी समारोप

ईस्ट बंगालचा गोलरक्षक सुवम सेन झेपावला, पण तो अपयशी ठरला

दैनिक गोमन्तक

पणजी ः हुकमी अनुभवी खेळाडू सुनील छेत्री याने पूर्वार्धात नोंदविलेल्या गोलच्या बळावर माजी विजेत्या बंगळूर एफसीने आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेतील मोहिमेचा विजयी समारोप केला. वास्को येथील टिळक मैदानावर शनिवारी त्यांनी ईस्ट बंगालला 1-0 फरकाने निसटते हरविले.

छेत्रीने सामन्यातील एकमात्र गोल 24व्या मिनिटास केला. भारतीय फुटबॉल संघाच्या कर्णधाराचा हा यंदाच्या स्पर्धेतील चौथा गोल ठरला. या 37 वर्षीय आघाडीपटूने आता आयएसएल (ISL) स्पर्धेतील 114 सामन्यांत 51 गोल केले आहेत. नायजेरियन बार्थोलोम्यू ओगबेचे (52 गोल) याच्यानंतर तो दुसऱ्या स्थानी राहिला. बंगळूरचा (Bangalore) हा 20 लढतीतील आठवा विजय ठरला. 29 गुणांसह ते सहाव्या स्थानी राहिले. 20 पैकी 11 सामने गमावलेल्या ईस्ट बंगालवर यंदाच्या स्पर्धेतील मोहीम तळाच्या अकराव्या क्रमांकावरून संपविण्याची पाळी आली. त्यांच्या खाती 11 गुण जमा झाले.

याया बनाना याच्याकडून मिळालेल्या चेंडूवर छेत्रीने प्रतिस्पर्धी बचावपटू अनंत तमांग याला चकवून फटका मारला. त्यावेळी चेंडू अडविण्यासाठी ईस्ट बंगालचा गोलरक्षक सुवम सेन झेपावला, पण तो अपयशी ठरला. त्यापूर्वी दोन मिनिटे अगोदर ईस्ट बंगालच्या अंतोनियो पेरोसेविच याने गोल करण्याची सोपी संधी दवडली होती. समोर केवळ गोलरक्षक लारा शर्मा असताना पेरोसेविच याचा नेम भेदक ठरू शकला नाही. गोलरक्षकाने दक्षता दाखवत चेंडू दिशाहीन केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT