Ballon d’Or 2023 Award Ceremony live streaming in India details:
फुटबॉलमध्ये बॅलन डी'ओर हा मानाचा पुरस्कार मानला जातो. दरवर्षी फ्रान्स फुटबॉल या फ्रेंच मासिकाकडून हा पुरस्कार दिला जातो. साल 1956 पासून हा पुरस्कार दिला जात असून यंदा या पुरस्काराचे 67 वे वर्ष आहे.
हा पुरस्कार सर्वाधिक वेळा जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये लिओनल मेस्सी असून त्याच्या पाठोपाठ ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे.
प्रत्येक हंगामात शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठी असलेला बॅलन डी'ओर हा पुरस्कार दिला जातो.
दरम्यान, यंदा बॅलन डी'ओर पुरस्काराबरोबरच फ्रान्स फुटबॉल कोपा ट्रॉफी, सॉक्रेट्स ऍवॉर्ड, गर्ड म्युलर ट्रॉफी आणि क्लब ऑफ द ईयर या पुरस्कार विजेत्यांचीही घोषणा करणार आहे.
कधी होणार बॅलन डी'ओर बॅलन डी'ओर पुरस्कार 2023 सोहळा?
बॅलन डी'ओर पुरस्कार 2023 सोहळा मंगळवारी (31 ऑक्टोबर) भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 1.15 वाजता सुरू होणार आहे.
कुठे होणार बॅलन डी'ओर पुरस्कार 2023 सोहळा?
बॅलन डी'ओर पुरस्कार 2023 सोहळा पॅरिसमध्ये थिएटर द्यु शॉतल येथे होणार आहे.
बॅलन डी'ओर पुरस्कार 2023 सोहळा भारतात कुठे पाहाता येईल?
बॅलन डी'ओर पुरस्कार 2023 सोहळ्याचे प्रक्षेपण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर पाहाता येणार आहे.
बॅलन डी'ओर पुरस्कार 2023 सोहळ्याचे डिजिटल प्रक्षेपण कसे पाहाता येईल?
बॅलन डी'ओर पुरस्कार 2023 सोहळ्याची डिजिटल प्रक्षेपण भारतात L’Equipe च्या युट्यूब चॅनेलवर मोफत पाहाता येणार आहे.
अँद्रे ओनाना - मँचेस्टर युनायटेड/कॅमेरून
जोस्को ग्वारडिओल - मँचेस्टर सिटी/क्रोएशिया
करिम बेंझेमा - अल इत्तिहाद
जामेल मुसिएला - बायर्न म्युनिच/जर्मनी
मोहम्मद सालाह - लिव्हरपूल/इजिप्त
ज्युड बेलिंगघम - रिएल मद्रिद/इंग्लंड
बुकायो साका - अर्सेनल/इंग्लंड
रांदल कोलो मौनी - पॅरिस सेंट-जर्मेन/फ्रान्स
केविन डी ब्रुयेन - मँचेस्टर सिटी/बेल्जियम
बर्नांडो सिल्वा - मँचेस्टर सिटी/पोर्तुगाल
एमिलिनो मार्टिनेझ - ऍस्टोन विला/अर्जेंटिना
ख्विचा क्वारात्सखेलिया - नापोली/जॉर्जिया
रुबेन दियास - मँचेस्टर सिटी/पोर्तुगाल
निकोलो बारेला - इंटर मिलान/इटली
एर्लिंग हालंड - मँचेस्टर सिटी/नॉर्वे
यासिन बौनो - अल हिलाल/मोरोक्को
मार्टिन ओडेगार्ड - अर्सेनल/नॉर्वे
ज्युलियन अल्वारेज - मँचेस्टर सिटी/अर्जेटिंना
इल्के गुंडोगन - बार्सिलोना/जर्मनी
व्हिनिसियस ज्युनियर - रिअल माद्रिद/ब्राझील
लिओनेल मेस्सी - इंटर मियामी/अर्जेंटिना
रॉड्रि - मँचेस्टर सिटी/स्पेन
लॉटारो मार्टिनेझ - इंटर मिलान/अर्जेंटिना
अँटोइन ग्रिजमन - ऍटलेटिको माद्रिद/फ्रान्स
रॉबर्ट लेवांडोव्स्की - बार्सिलोना/पोलंड
कायलिन एमबाप्पे - पॅरिस सेंट-जर्मेन/फ्रान्स
किम मिन-जे - नेपोली/दक्षिण कोरिया
व्हिक्टर ओसिमहेन - नेपोली/नायजेरिया
लुका मॉड्रिक - रिअल माद्रिद/क्रोएशिया
हॅरी केन - बायेर्न म्युनिच इंग्लंड
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.