Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

Babar Azam: पाक PM यांच्या ट्विटवर बाबर आझमला विचारला प्रश्न, म्हणाला...

Babar Azam on Shehbaz Sharif Tweet: T20 विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकिस्तान संघाने प्रवेश केला आहे.

दैनिक गोमन्तक

Babar Azam on Shehbaz Sharif Tweet: T20 विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकिस्तानने प्रवेश केला आहे. आता त्यांचा सामना इंग्लंडशी होणार आहे. अंतिम सामना उद्या, (रविवार) 13 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियातील आयकॉनिक मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर (MCG) खेळवला जाईल. तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या ट्विटचा संदर्भ देत बाबरला प्रश्न विचारण्यात आला. जे ट्विट त्यांनी भारताच्या पराभवानंतर केले होते.

इंग्लंडने भारताचे स्वप्न भंगले

जोस बटलरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडने दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. अ‍ॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाचा 10 विकेट्सनी पराभव झाला. त्याचवेळी बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखालील संघाने न्यूझीलंडचा पराभव करुन अंतिम फेरीचे तिकीट बुक केले. आता अंतिम फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आहेत.

पीएम शाहबाज यांनी ट्विट केले होते

भारताच्या (India) उपांत्य फेरीतील पराभवानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक ट्विट केले होते. त्यावर त्यांनी खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी लिहिले होते की, '152/0 वि 170/0. वास्तविक, T20 विश्वचषकाच्या शेवटच्या आवृत्तीत पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना एकही विकेट न गमावता 152 धावा करुन जिंकला होता. आता इंग्लंडने (England) एकही विकेट न गमावता 170 धावा करत विजय मिळवला.' आता पत्रकार परिषदेत बाबर आझमला या ट्विटबाबत प्रश्न विचारण्यात आला.

बाबरला प्रश्न

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला विचारण्यात आले की, भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानचे पीएम शाहबाज शरीफ यांनी ट्विट केले होते, अशा परिस्थितीत तुमच्यावर काही दबाव आहे का की अशी व्यक्ती सामना पाहत आहे, त्यावर बाबर म्हणाला की, 'दबाव असे काही नाही. मी अजून ते ट्विट पाहिलेले नाही. मला या गोष्टीबद्दल माहिती नाही. विरोधक कोणीही असला तरी त्याच्याविरुद्ध आम्ही सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतो.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

SCROLL FOR NEXT