Pakistan Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: 7 वर्षांनंतर पाकिस्तान संघ भारतात दाखल, सराव सामन्यात न्यूझीलंड अन् कांगारुंशी होणार सामना; पाहा Video

Pakistan Cricket Team: आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तान संघ बुधवारी (27 सप्टेंबर) भारतात पोहोचला.

Manish Jadhav

Pakistan Cricket Team: आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तान संघ बुधवारी (27 सप्टेंबर) भारतात पोहोचला. पाकिस्तानचा संघ तब्बल 7 वर्षांनंतर भारतात आला आहे.

यापूर्वी 2016 मध्ये टी-20 विश्वचषकादरम्यान पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. व्हिसा समस्यांमुळे पाकिस्तान संघाचा भारत दौरा लांबला. वेळेवर व्हिसा न मिळाल्याने संघाला आपल्या योजनेत अनेक बदल करावे लागले.

सराव सामन्यासाठी 27 सप्टेंबरला हैदराबादला पोहोचण्यापूर्वी पाकिस्तानला (Pakistan) दुबईत दोन दिवसीय 'टीम बाँडिंग' सत्र होणार होते. पण भारतीय व्हिसाच्या अनिश्चिततेमुळे दुबईचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

दरम्यान, पाकिस्तान संघ 18 खेळाडू आणि 13 सपोर्ट स्टाफसह भारतात आला आहे. पाकिस्तानचा संघ 27 सप्टेंबर रोजी रात्री 8.15 च्या सुमारास भारतात पोहोचला. संघाचा पहिला सराव सामना 29 सप्टेंबरला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

तर दुसरा सराव सामना 4 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. पाकिस्तानचा संघ विश्वचषकातील पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे.

2016 मध्ये भारतात (India) झालेल्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानचा संघ शेवटचा सहभागी झाला होता. दोन देशांमधील राजनैतिक तणावामुळे, पाकिस्तान संघ फक्त आशिया कप आणि आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात.

पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT