Team India PTI
क्रीडा

IND vs ENG: आवेश बाहेर, तर पाटीदारची टीम इंडियात एंट्री; पहिल्या कसोटीआधी BCCI ने केले महत्त्वाचे बदल

IND vs ENG: पहिल्या कसोटीपूर्वी बीसीसीआयने आवेश खानला भारतीय संघातून मुक्त करण्यात आले असून रजत पाटीदारचा समावेश करण्यात आला आहे.

Pranali Kodre

India vs England, Test Series, Avesh Khan, Rajat Patidar:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात गुरुवारपासून (25 जानेवारी) पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाली आहे. पहिला सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. दरम्यान, पहिल्या सामन्याला सुरुवात होण्याआधी बीसीसीआयने 15 जणांच्या संघातील बदल घोषित केले आहेत.

बीसीसीआयने याआधी काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. या संघात वेगवान गोलंदाज आवेश खानलाही संधी दिली होती.

मात्र पहिल्या सामन्यापूर्वी त्याला रणजी ट्रॉफीचा सामना खेळण्यासाठी भारतीय संघातून मुक्त करण्यात आले आहे.

पहिल्या सामन्यासाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नसल्याने तो मध्यप्रदेशकडून पदुच्चेरीविरुद्ध 26 जानेवारीपासून चालू होणाऱ्या रणजी सामन्यात खेळू शकतो. याबाबत बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील नाणेफेकीनंतर माहिती दिली आहे.

विराटचा बदली खेळाडू

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात विराट कोहलीचाही समावेश होता. मात्र पहिल्या कसोटीला काही दिवस शिल्लक असतानाच त्याने वैयक्तिक कारणाने पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यातून माघार घेतली.

त्यामुळे आता बीसीसीआयने त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केली आहे. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी रजत पाटीदार विराटचा बदली खेळाडू म्हणून भारतीय संघात सामील झाला आहे.

पण पाटीदारला पहिल्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. पाटीदार सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकतेच भारतीय अ संघाकडून इंग्लंड अ संघाविरुद्ध खेळताना दोन शतके केली होती.

पहिल्या कसोटीत इंग्लंडने जिंकली नाणेफेक

दरम्यान, भारताविरुद्ध हैदराबादला होत असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ प्रथम गोलंदाजीसाठी उतरला.

पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

  • इंग्लंड - झॅक क्रावली, बेन डकेट, ऑली पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड, जॅक लीच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bench: चिंबलमधील बेकायदेशीर 43 बोअरवेल्स मालकांना मोठा दणका! गोवा खंडपीठाचे भूजल अधिकाऱ्यांना कठोर दंडात्मक कारवाईचे आदेश

Goa Agriculture: कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना; गरज भासल्यास नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी ग्वाही

Goa Education: उज्ज्वल भविष्यासमोर गळतीचे मोठे आव्हान! 28 % विद्यार्थी पोहोचत नाहीत बारावीपर्यंत; राज्यातील स्थिती, 'युडीआयएसई प्लस' अहवालातून समोर

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

Goa Weather Update: मुसळधार पावसानंतर राज्यात दिलासादायक चित्र; पावसाचा जोर ओसरला, शेतकरी हवालदील

SCROLL FOR NEXT