ISL football Dainik gomantak
क्रीडा

एटीके मोहन बागानची लढत बंगळूरशी, दोन्ही संघ पाच सामने अपराजित

एटीके मोहन बागानने सध्या नऊ सामन्यांतून 15 गुण आहेत

दैनिक गोमन्तक

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (ISL football) स्पर्धेच्या आठव्या मोसमात एटीके मोहन बागान आणि बंगळूर एफसी सलग पाच सामने अपराजित आहेत, पण त्यापैकी तीन सामने बरोबरीत सुटले. उभय संघांतील लढत शनिवारी (ता. 15) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होईल, त्यावेळी कोंडी फोडण्यासाठी दोन्ही संघ इच्छुक असतील.

एटीके मोहन बागान आणि बंगळूर यांच्यातील पहिल्या टप्प्यातील सामना गेल्या 16 डिसेंबर रोजी झाला होता, तेव्हा बांबोळी येथील लढत 3-3 अशी गोलबरोबरीत राहिली होती. खेळाडू कोविड (covid-19) बाधित आढळल्यामुळे एटीके मोहन बागानचा मागील शनिवारचा ओडिशा एफसीविरुद्ध सामना लांबणीवर टाकण्यात आला.

नवे प्रशिक्षक हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील तीन लढतीत कोलकात्याच्या संघाने दोन विजय नोंदविले असून एक सामना बरोबरीत राखला आहे. निलंबनामुळे प्रमुख मध्यरक्षक ह्युगो बुमूस याच्या अनुपस्थितीत एटीके मोहन बागानला खेळावे लागेल.

गतविजेत्या मुंबई (Mumbai) सिटीला पराभूत केल्यामुळे बंगळूरचा आत्मविश्वास उंचावलेला असेल, त्यामुळे शनिवारची लढत चुरसपूर्ण होण्याचे संकेत आहेत. बंगळूरचा बचावपटू रोशन नाओरेम याने स्पर्धेत उल्लेखनीय खेळ केला आहे. संघासाठी महत्त्वपूर्ण दुवा ठरताना त्याने पाच असिस्टची नोंद केली आहे. मुंबई सिटीविरुद्ध दोन गोल त्याच्याच असिस्टवर झाले.

फॉर्ममध्ये असलेला कोंगो देशाचा आघाडीपटू प्रिन्स इबारा याचा एटीके मोहन बागानला धोका असेल. त्याने मुंबई सिटीविरुद्ध दोन गोल करताना स्पर्धेत एकूण चार वेळा चेंडूची नेटची दिशा दाखविली आहे.

‘टॉप फोर’चे लक्ष्य

एटीके मोहन बागानने सध्या नऊ सामन्यांतून 15 गुण आहेत. शनिवारी विजय नोंदविल्यास गुणतक्त्यातील पहिल्या चार संघांत (टॉप फोर) जागा मिळविण्याची गतउपविजेत्यांची आशा पल्लवित होईल. माजी विजेता बंगळूर (Bangalore) एफसीही प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. 11 सामने खेळल्यानंतर त्यांच्या खाती 13 गुण आहेत. एटीके मोहन बागानने 20 गोल, तर बंगळूरने 19 गोल नोंदवले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

SCROLL FOR NEXT