ATK Mohan Bagan Dainik gomantak
क्रीडा

आयएसएल स्पर्धेत स्वयंगोलमुळे एटीके मोहन बागानचे नुकसान

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेला सामना 1-1 गोलबरोबरीत राहिला

दैनिक गोमन्तक

पणजी : एटीके मोहन बागानचा कर्णधार प्रीतम कोटल याच्या स्वयंगोलमुळे गतविजेत्या मुंबई सिटीला गुरुवारी आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेत एका गुणाचा लाभ मिळाला. फातोर्डा (Fatorda) येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेला सामना 1-1 गोलबरोबरीत राहिला.

मुंबई सिटीच्या बचावफळीतील गलथानपणाचा लाभ उठवत ऑस्ट्रेलियन आघाडीपटू डेव्हिड विल्यम्स याने नवव्या मिनिटास एटीके मोहन बागानला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 24व्या मिनिटास प्रीतमने चूक केली आणि गतविजेत्यांच्या खाती बरोबरी जमा झाली. प्रत्येकी एकच गुण मिळाल्यामुळे दोन्ही संघांना गुणतक्त्यात मोठी प्रगती साधणे शक्य झाले नाही.

एटीके मोहन बागानचे 12 लढतीतून 20 गुण झाले असून त्यांचे पाचवे स्थान कायम राहिले. मुंबई सिटी संघ 13 लढतीनंतर 19 गुणांसह सहाव्या स्थानी आला. समान गुण झाल्यानंतर मुंबई सिटीने (+2) चेन्नईयीन एफसीला (-5) पहिल्या टप्प्यात मुंबई सिटीने एटीके मोहन बागानला 5-1 फरकाने धुव्वा उडविला होता, त्याचा वचपा काढणे कोलकात्याच्या संघाला गुरुवारी शक्य झाले नाही.

चुकीमुळे दोन्ही संघांच्या खात्यात गोलची भर पडली. नवव्याच मिनिटास मुंबई सिटीच्या अहमद जाहू याची चूक एटीके मोहन बागानच्या पथ्यावर पडली. मुर्तदा फॉलच्या पासवर जाहूने चेंडू दिशाहीन करणे आवश्यक होते, पण तसे झाले नाही. त्याचा लाभ उठवत ह्युगो बुमूसने डेव्हिड विल्यम्सला दिलेल्या पासवर ऑस्ट्रेलियन खेळाडूने गोलरक्षक महंमद नवाजला चकवा देत मोसमातील तिसरा गोल नोंदविला. नंतर अनपेक्षितपणे मुंबई सिटीला बरोबरीचा लाभ मिळाला. एटीके मोहन बागानचे नेतृत्व करणारा बचावपटू प्रीतम कोटलने आपल्याच संघाच्या नेटमध्ये हेडिंग केल्यामुळे गतविजेत्यांना पिछाडी भरून काढता आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT