एटीके मोहन बागान, बंगळूरला बरोबरीचा गुण

 

Dainik Gomantak

क्रीडा

एटीके मोहन बागान, बंगळूरला बरोबरीचा गुण

एटीके मोहन बागानसाठी सुभाशिष बोस, ह्यूगो बुमूस व रॉय कृष्णा यांनी, तर माजी विजेत्या बंगळूरसाठी क्लेटन सिल्वा, दानिश फारूख व प्रिन्स इबारा यांनी प्रत्येकी एक गोल केला.

दैनिक गोमन्तक

पणजी: एकूण सहा वेगवेगळ्या खेळाडूंनी गोल केलेल्या इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल (Football) लढतीत एटीके मोहन बागान व बंगळूर एफसी (ATK Mohan Bagan and FC Bangalore) यांनी 3-3 गोलबरोबरीसह प्रत्येकी एका गुणाची प्राप्ती केली. सामना गुरुवारी बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर झाला.

एटीके मोहन बागानसाठी सुभाशिष बोस, ह्यूगो बुमूस व रॉय कृष्णा यांनी, तर माजी विजेत्या बंगळूरसाठी क्लेटन सिल्वा, दानिश फारूख व प्रिन्स इबारा यांनी प्रत्येकी एक गोल केला. एटीके मोहन बागानची ही सलग दुसरी बरोबरी ठरली. त्यांचे सहा लढतीनंतर आठ गुण झाले असून ते सहाव्या स्थानी कायम आहेत. ओळीने तीन सामने गमावल्यानंतर बंगळूरला एक गुण मिळाला. त्यांची ही स्पर्धेतील दुसरी बरोबरी असून सात लढतीतून पाच गुणांसह ते नवव्या क्रमांकावर आहेत.

पूर्वार्धात दोन्ही संघ 2-2 असे गोलबरोबरीत होते. बचावपटू सुभाशिष बोस याने 13व्या मिनिटाल कोलकात्याच्या संघास आघाडी मिळवून दिल्यानंतर ब्राझीलियन क्लेटन सिल्वा याने पेनल्टी फटक्यावर बंगळूरचा बरोबरी साधून दिली. या 34 वर्षीय आघाडीपटूचा हा यंदाच्या आयएसएल स्पर्धेतील चौथा गोल ठरला. नंतर 26व्या मिनिटास आयएसएल स्पर्धेतील पहिला वैयक्तिक गोल नोंदवून श्रीनगर येथील दानिश फारूखने बंगळूरला 2-1 असे आघाडीवर नेले. मात्र 38व्या मिनिटास फ्रेंच खेळाडू ह्युगो बुमूसच्या गोलमुळे एटीके मोहन बागानने 2-2 अशी बरोबरी साधली. बुमूसचा हा यंदाचा तिसरा, तर एकंदरीत 22वा आयएसएल गोल ठरला.

सामन्याच्या 58व्या मिनिटास रॉय कृष्णा याने पेनल्टी फटका अचूक मारत एटीके मोहन बागानला पुन्हा वर्चस्व मिळवून दिले. फिजी देशाच्या कर्णधाराने यंदा तिसरा, तर एकदंरीत 32वा आयएसएल गोल केला. कोंगो देशाचा आघाडीपटू प्रिन्स इबारा याने 72व्या मिनिटास कॉर्नर फटक्यावर साधलेल्या हेडिंगमुळे बंगळूर एफसीने पुन्हा बरोबरी साधली आणि नंतर सामना संपेपर्यंत कोंडी कायम राहिली. इबारा याचा हा यावेळचा दुसरा गोल ठरला.

सुनील छेत्री बदली खेळाडू

यावेळच्या आयएसएल स्पर्धेत हुकमी खेळाडू सुनील छेत्री याला सूर गवसला नसून त्याने गोल केलेला नाही. गुरुवारी बंगळूर एफसीचा हा अनुभवी खेळाडू बेंचवर बसला आणि एटीके मोहन बागानविरुद्ध 85व्या मिनिटास बदली खेळाडू या नात्याने मैदानात उतरला, पण त्याची मोसमातील गोलची पाटी कोरीच राहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT