Sunil Chhetri Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games 2023: 'करो या मरो' सामन्यात भारत जिंकला, सुनील छेत्रीचा जलवा पुन्हा दिसला!

India Defeated Bangladesh In Football Match: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाने बांगलादेशचा पराभव केला आहे.

Manish Jadhav

India Defeated Bangladesh In Football Match: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाने बांगलादेशचा पराभव केला आहे. भारताने रोमहर्षक सामन्यात बांगलादेशचा 1-0 असा पराभव केला.

सुनील छेत्रीने अखेरच्या क्षणी गोल करत भारताला विजय मिळवून दिला. सामना लाईव्ह पाहणाऱ्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता, सामना अनिर्णित राहील असे वाटत होते, पण सुनील छेत्रीने अखेरच्या क्षणी गोल करत बांगलादेशचा पराभव केला.

दरम्यान, या विजयासह भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेतही विजयी सुरुवात केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचा हा पहिलाच विजय आहे.

यापूर्वी भारत (India) आणि चीन यांच्यात फुटबॉल सामना झाला होता, मात्र त्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यामुळे चाहत्यांचे मनोधैर्यही खचले होते, मात्र आज बांगलादेशला पराभूत केल्यानंतर चाहते पुन्हा आनंदी झाले.

विशेष म्हणजे, चाहत्यांनी मैदानात घोषणाबाजी केली. सामना जिंकल्यानंतर संपूर्ण स्टेडियम 'इंडिया-इंडिया' च्या नाऱ्यांनी दुमदुमत होते.

सामना सुरु होऊन 84 मिनिटापर्यंत दोन्ही संघांकडून एकही गोल झाला नसल्याने सामना अनिर्णित राहिल असं वाटत होतं, मात्र गेमच्या 85 व्या मिनिटाला सुनील छेत्रीने गोल करुन सामना बरोबरीत आणला आणि शेवटी सामना भारताने जिंकला.

पहिल्या सामन्यात भारताचा चीनकडून पराभव झाला होता

भारतीय फुटबॉल संघासमोर सर्वात मोठे आव्हान यजमान चीनचे होते हे विशेष. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली. मात्र, अखेर या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे, बांगलादेशनेही (Bangladesh) पहिल्याच सामन्यात म्यानमारकडून पराभवाची चव चाखली होती.

अशा स्थितीत दोन्ही संघांनी पहिला सामना गमावला होता. आजचा सामना जिंकून दोन्ही संघांना या स्पर्धेत आपले स्थान मजबूत करायचे होते, परंतु भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत बांगलादेशच्या आशा धुळीस मिळवल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘प्रॉग’ मदतीला आलाय, गोवा तयार आहे?

केतन भाटीकरांच्या निधनानंतरचे बारा दिवस..

Bank Holidays in June: लवकर कामं उरका! जून महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद; रिझर्व्ह बँकेनं जारी केलं सुट्ट्यांचे संपूर्ण वेळापत्रक

अर्शदीप सिंगने इन्स्टाग्रामवर चालवले 'क्लीनअप ड्राइव्ह'; विराट कोहलीसोबतची 'ती' व्हायरल रीलही केली डिलीट, नेमकं झालं काय?

Tourist Assault: कायदा हातात घेणाऱ्यांवर त्वरित कठोर कारवाई करा, सिंधुदुर्गातील नागरिकांशी झालेला वाद व हल्ला निंदनीय- जितेश कामत

SCROLL FOR NEXT