Asian Champions Trophy India vs Japan Dainik Gomantak
क्रीडा

Asian Champions Trophy Hockey: आता मिशन फायनल! अपराजित भारतासमोर उपांत्य फेरीत जपानचे आव्हान

India vs Japan Semifinal: आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धेत भारत आणि जपान संघात शुक्रवारी उपांत्य सामना रंगणार असून कुठे आणि कसा हा सामना पाहू शकता जाणून घ्या.

Pranali Kodre

Asian Champions Trophy Hockey, India vs Japan semifinal, live Streaming Details: आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धेची उपांत्य फेरी शुक्रवारी (11 ऑगस्ट) खेळवली जाणार आहे.

या फेरीत भारतीय हॉकी संघासमोर जपानचे आव्हान असणार आहे. हा सामना चेन्नईमधील मेयर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

या स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला आहे. भारताने साखळी फेरीत 4 विजय आणि 1 बरोबरी साधत गुणतालिकेतील अव्वल क्रमांकासह उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.

जपानने साखळी फेरीतील 1 विजय, 2 पराभव आणि 2 बरोबरी यासह चौथ्या क्रमांकावर राहात उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले.

दरम्यान, साखळी फेरीत भारताला केवळ जपानविरुद्ध विजय मिळवता आला नव्हता. त्या सामन्यात 1-1 अशी बरोबरी झाली होती. पुन्हा एकदा हे दोन संघच आता आमने-सामने येणार आहेत.

आमने-सामने आकडेवारी

भारत आणि जपान यांच्यात आत्तापर्यंत 34 सामने झाले आहेत. यामध्ये बऱ्याचवेळा भारतीय संघाचे वर्चस्व राहिल्याचे दिसते. भारताने 27 सामने जिंकले आहेत, तसेच जपानला 3 वेळाच विजय मिळवता आला आहे. याशिवाय 4 सामने बरोबरीत सुटले आहेत.

आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धेत जपान आणि भारत यांच्यात आत्तापर्यंत 9 वेळा सामने झाले असून भारताने 5 सामने जिंकले आहेत आहेत आणि दोन सामन्यात बरोबरी झाली आहे. तसेच जपानने 2 सामने जिंकले आहेत.

दरम्यान सध्या भारतीय संघ क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे, तर जपान 19 व्या क्रमांकावर आहे.

केव्हा आणि कुठे होणार सामना

भारत आणि जपान यांच्यातील उपांत्य सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना चाहते स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर पाहू शकतात.

तसेच फॅन कोड ऍप आणि वेबसाईटवरही या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिंमिंगवर पाहू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT