Team India Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup Final: सिराजने श्रीलंकेला नाचवले! भारतासमोर चॅम्पियन बनण्यासाठी 51 धावांचे आव्हान

IND vs SL Final: आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने विजयासाठी भारतासमोर माफक ५१ धावांचे आव्हान ठेवले आहे.

Pranali Kodre

Asia Cup Final 2023 India need 51 runs to win against Sri Lanka :

आशिया चषक 2023 स्पर्धेत रविवारी (17 सप्टेंबर) भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात अंतिम सामना खेळवला जात आहे. आर प्रेमदासा स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर 51 धावांचे आव्हान ठेवले आहे.

श्रीलंकेचा संघ 15.2 षटकात 50 धावावंर सर्वबाद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने 6 विकेट्स घेतल्या. यातील चार विकेट्स त्याने चौथ्याच षटकात घेतल्या.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे श्रीलंकेकडून पाथम निसंका आणि कुशल परेरा सलामीला फलंदाजीला आले होते. पण पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर परेराला जसप्रीत बुमराहने शुन्यावर बाद केले.

त्यानंतर मात्र, मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीपुढे श्रीलंकन फलंदाजांची भंबेरी उडाली. चौथ्या षटकात सिराजने तब्बल चार विकेट्स घेतल्या. त्याने या षटकात पाथम निसंकाला (2) पहिल्या चेंडूवर, सदिरा समरविक्रमाला (0) तिसऱ्या चेंडूवर, चरिथ असलंकाला (0) चौथ्या चेंडूवर आणि धनंजय डी सिल्वाला (4) सहाव्या चेंडूवर बाद केले.

त्यामुळे श्रीलंकेची अवस्था 5 षटकात 12 धावात 5 विकेट्स अशी झाली होती. त्यातून श्रीलंकेचा संघ सावरु शकला नाही. विशेष म्हणजे सहाव्या षटकात कर्णधार दसून शनकालाही शुन्यावर सिराजने माघारी धाडले.

यानंतर 12 व्या षटकात संयमी खेळणाऱ्या कुशल मेंडिसला सिराजनेच 17 धावांवर त्रिफळाचीत केले. 13 व्या षटकात हार्दिक पंड्याने दुनिल वेललागेला 8 धावांवर माघारी धाडले. 16 व्या षटाच्या पहिल्या दोन चेंडूवर हार्दिकने अनुक्रमे प्रमोद मदुशन (1) आणि मथिशा पाथिराना (0) यांना बाद करत श्रीलंकेचा डाव संपवला. श्रीलंकेकडून दूशन हेमंता 13 धावांवर नाबाद राहिला.

भारताकडून मोहम्मद सिराजने 7 षटकात 21 धावांत 6 विकेट्स घेतल्या, तसेच हार्दिक पंड्याने 2.2 षटके गोलंदाजी करताना 3 धावांत 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर जसप्रीत बुमराहने 5 षटकात 23 धावा देत 1 विकेट घेतली.

आता जर भारताने 51 धावांचे आव्हान पूर्ण केले, तर भारतीय संघ आठव्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद मिळवणार आहे. यापूर्वी भारताने 1984, 1988, 1991, 1995, 2010, 2016 आणि 2018 साली आशिया चषकाचे विजेतेपद जिंकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT