Shreyas Iyer | Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: निराशा अन् फक्त निराशा... श्रेयस बाद होताच रोहितची रिऍक्शन व्हायरल

India vs Pakistan: श्रेयस अय्यरला पाकिस्तानविरुद्ध पुनरागमन करताना मोठी खेळी करण्यात अपयश आले.

Pranali Kodre

भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आशिया चषकातील सामना शनिवारी (2 सप्टेंबर) खेळवला जात आहे. कँडीमध्ये होत असलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक राहिली.

या सामन्यादरम्यान सातत्याने पावसाची ये-जा सुरू होती. अशा परिस्थितीत भारताच्या वरच्या फळीला शाहिन शाह आफ्रिदी आणि हॅरिस रौफ यांच्या गोलंदाजीने संघर्ष करायला लावला.

भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सलामीला फलंदाजी केली. पण त्यांना चांगली सुरुवात देता आली नाही. रोहितला ११ धावांवर आफ्रिदीने त्रिफळाची केले. तसेच त्यानंतर काही वेळातच तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या विराट कोहलीलाही ४ धावांवर आफ्रिदीनेच त्रिफळाचीत करत माघारी धाडले.

त्यानंतर श्रेयस अय्यरने गिलला साथ देण्याचा प्रयत्न केला. त्याने ८ व्या षटकात रौफविरुद्ध दोन चौकारही ठोकले. मात्र, १० व्या षटकात रौफनेच अय्यरला बाद केले. १० व्या षटकाचा ५ वा चेंडू रौफने आखुड टप्प्याचा टाकला. त्यावर श्रेयस अय्यरने पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न केला.

पण , त्याचा हा फटका चूकला आणि मिड-ऑफला फखर जमानने वर हात करत चेंडू झेलला. त्यावेळी श्रेयसही काही सेकंद निराशेने तसाच उभा होता. त्यानंतर तो १४ धावांवर माघारी परतला. यावेळी ड्रेसिंग रुममध्ये उभा असलेला रोहित शर्माही खूपच निराश झालेला दिसला.

दरम्यान, श्रेयसचा हा पुनरागमनाचा सामनाही आहे. तो मार्चपासून दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नव्हता. पण पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर तो भारतीय संघाकडून पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदाच मैदानात उतरला. मात्र, त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले.

दरम्यान, काही वेळातच शुभमन गिललाही रौफने त्रिफळाचीत केले. तो 32 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था 14.1 षटकात 4 बाद 66 धावा अशी झाली होती. मात्र, यानंतर इशान किशन आणि हार्दिक पंड्या यांनी शतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. या दोघांनीही वैयक्तिक 50 धावांचा टप्पा पार केला.

असे आहेत 11 जणांचे संघ

  • भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

  • पाकिस्तान संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आघा, इफ्तिखान अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाझ, नसीम शाह, शाहिन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT