India vs Nepal Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NEP: भारताने जिंकला टॉस, बुमराहऐवजी 'या' खेळाडूला मिळाली संधी; पाहा 'प्लेइंग-11'

Asia Cup: आशिया चषकात सोमवारी नेपाळविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आहे. या सामन्यात बुमराह खेळणार नाही.

Pranali Kodre

Asia Cup 2023 India vs Nepal Playing XI :

सोमवारी आशिया चषक २०२३ स्पर्धेत भारत विरुद्ध नेपाळ संघात सामना रंगणार असून श्रीलंकेतील कँडीमधील पाल्लेकेले क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. अ गटातील हा अखेरचा साखळी सामना आहे.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यात भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. या सामन्यासाठी जसप्रीत बुमराह ऐवजी मोहम्मद शमीला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. बुमराह त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी मायदेशी परतला आहे. त्याची पत्नी संजनाने या सामन्याआधी त्यांच्या मुलाला जन्म दिला आहे. त्याचमुळे बुमराह नेपाळविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध नाही.

तसेच या सामन्यासाठी नेपाळनेही प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला असून अरिफ शेखच्या जागेवर भीम शार्कीला संधी मिळाली आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की भारताचा नेपाळविरुद्ध हा पहिलाच वनडे सामना आहे. दरम्यान, सुपर-४ फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ अ गटातून पाकिस्ताननंतर सुपर-४ फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ ठरणार आहे.

दरम्यान, हा सामना जरी रद्द झाला किंवा बरोबरीत सुटला, तरी भारतीय संघ सुपर ४ फेरीतील स्थान पक्के करू शकतो. मात्र, नेपाळला सुपर-४ मध्ये जाण्यासाठी विजय गरजेचाच आहे.

असे आहेत ११ जणांचे संघ -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

  • नेपाळ - कुशल भुरटेल, आसिफ शेख (यष्टीरक्षक), रोहित पौडेल (कर्णधार), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी, ललित राजबंशी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT