Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NEP: कर्णधार रोहितला हिटमॅननेच अफलातून कॅच घेत पाठवलं तंबुत, पाहा Video

Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेतील भारत विरुद्ध नेपाळ संघातील सामन्यात कर्णधार रोहितचा झेल चर्चेचा विषय ठरला होता.

Pranali Kodre

Asia Cup 2023, India vs Nepal, Rohit Sharma taken Rohit Paudel Catch:

भारत विरुद्ध नेपाळ संघात आशिया चषकाच्या साखळी फेरीतील सामना कँडी येथील पाल्लेकेले क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात नेपाळ संघ प्रथम फलंदाजीला उतरला आहे. दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्माने घेतलेला झेल चर्चेचा विषय ठरला.

भारतीय संघाची सुरुवातीला ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले होते. भारतीय क्षेत्ररक्षकांकडून पहिल्या 5 षटकातच 3 झेल सुटले. मात्र, त्यानंतर भारताने त्यांचे क्षेत्ररक्षण सुधारत काही चांगले झेल घेतले. यात रोहित शर्माने घेतलेल्या झेलाचाही समावेश आहे.

नेपाळने 77 धावांवर 2 विकेट्स गमावल्यानंतर नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र त्याला फार काही करता आले नाही. तो 20 व्या षटकात रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर रोहित शर्माकडे झेल देत बाद झाला.

जडेजाने टाकलेल्या या षटकातील सहाव्या चेंडूवर रोहित पौडेलने बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चेंडू त्याच्या बॅटची कड घेत मागे गेला. यावेळी स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या रोहित शर्माने थोडं गुडघ्यात वाकून शानदार झेल घेतला.

दरम्यान एका कर्णधार रोहितने दुसऱ्या कर्णधार रोहितचा झेल घेतल्याने हा झेल चर्चेत आला होता. रोहित पौडेलने 5 धावा केल्या.

दरम्यान, नेपाळकडून सुरुवात चांगली झाली होती. त्यांच्या सलामीवीरांनी 65 धावांची भागीदारी केली होती. पण सलामीवर कुशल भुरटेलला शार्दुल ठाकूरने बाद करत नेपाळला पहिला धक्का दिला. कुशल भुरटेलने 25 चेंडूत 38 धावा केल्या.

त्यानंतर रोहित पौडवाल, भीम शार्की (7) आणि कुशल मल्ला (2) झटपट बाद झाले. पण एक बाजू सांभाळलेल्या असिफ शेखने अर्धशतक केले. मात्र अर्धशतकानंतर त्याला मोहम्मद सिराजने बाद केले.

तथापि या सामन्यात सातत्याने पावसाचा व्यत्यय येत होता. पण नेपाळने 40 षटकात 6 बाद 184 धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT