Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2022: भारताला मोठा धक्का, रवींद्र जडेजा दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर

Ravindra Jadeja: आशिया कप 2022 मध्ये भारताने पहिले दोन सामने जिंकून सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे.

दैनिक गोमन्तक

Asia Cup 2022: आशिया कप 2022 मध्ये भारताने पहिले दोन सामने जिंकून सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे. यातच आता टीम इंडिया आपला पुढचा सामना पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील विजेत्याविरुद्ध खेळणार आहे, मात्र रविवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला आहे. जडेजाच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रक जारी करुन या वृत्तास दुजोरा दिला आहे.

बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रक जारी करुन म्हटले आहे की, "सध्या सुरु असलेल्या आशिया चषकात निवड समितीने रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) जागी अक्षर पटेलची निवड केली आहे. जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सध्या तो बीसीसीआयच्या (BCCI) वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. त्याच्या जागी अक्षर पटेलची यापूर्वी संघातील एक स्टँडबाय म्हणून निवड करण्यात आली होती. त्यामुळे तो लवकरच संघात सामील होणार आहे.''

दुसरीकडे, स्पर्धेच्या मध्यातच रवींद्र जडेजाला दुखापत होणे ही भारतासाठी (India) चांगली बातमी नाही. जडेजा सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) हाय-व्होल्टेज सामन्यात 35 धावांची मॅच-विनिंग इनिंग खेळी खेळली. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात त्याने 4 षटकात 15 धावा देत 1 बळी घेतला.

तसेच, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीकोनातूनही पाहिल्यास भारताला हा मोठा धक्का आहे. कारण आशिया कप संपल्यानंतर काही दिवसांतच बीसीसीआय जागतिक संघाची घोषणा करणार आहे. मात्र, जडेजाची दुखापत किती गंभीर आहे, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT