ashish nehra win ipl as a indian coach gujarat titans win ipl crown Dainik Gomantak
क्रीडा

आशिष नेहराने केले जे IPL इतिहासात कोणताही भारतीय करू शकला नाही, कारण...

हार्दिक पांड्या संघाचा कर्णधार होता आणि आशिष नेहरा प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत होता

दैनिक गोमन्तक

गुजरात टायटन्स (GT) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामात नवीन संघ म्हणून प्रवेश केला. परंतु त्यांच्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आणि पहिल्याच सत्रात विजेतेपद पटकावले. हार्दिक पांड्या संघाचा कर्णधार होता आणि आशिष नेहरा प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत होता.यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नेहराने विजेतेपद मिळवून इतिहास रचला आहे. आयपीएलमध्ये जे कोणीही भारतीय करू शकले नाही ते नेहराने आता केले आहे.

खरे तर नेहरा आयपीएल जिंकणारा पहिला भारतीय प्रशिक्षक ठरला आहे.याआधी अनिल कुंबळेने मेंटॉर असताना दोनवेळा आयपीएलचे जेतेपदही पटकावले आहे.पण त्यावेळी तो संघाचा प्रशिक्षक नव्हता. अनिल कुंबळे 2013 आणि 2015 च्या मोसमात मुंबई संघाचा मार्गदर्शक होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावले.(ashish nehra win ipl as a indian coach gujarat titans win ipl crown)

सामना जिंकल्यानंतर हार्दिक पांड्यानेही हे सांगितले, मात्र नेहराचाही यावर विश्वास बसला नाही. म्हणजेच नेहरालाही माहीत नव्हते की त्याने एवढा मोठा इतिहास रचला आहे. सामन्यानंतर मैदानावर बोलताना हार्दिक नेहराला म्हणाला, 'तुला कसं वाटतंय. आयपीएल ट्रॉफी उंचावणारे तुम्ही पहिले भारतीय प्रशिक्षक आहात.'' यावर नेहरा म्हणाला की, मला हे माहित नाही, पण योगायोगाने घडले आहे. पण भावना चांगली आहे कारण तुझ्या नेतृत्वाखाली संघाने किती चांगली कामगिरी केली आहे. ते इतके सोपे नव्हते.तसेच, खेळाडू आणि प्रशिक्षक असताना आयपीएलचे विजेतेपद पटकावणारा नेहरा आता तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी ही कामगिरी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि शेन वॉर्न यांच्या नावावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT