Australia-England

 

Dainik Gomantak 

क्रीडा

Ashes 2021: ऑस्ट्रेलिया-इंग्लंडच्या Playing XI झाला मोठा बदल

ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड यांच्यात सिडनीमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन जाहीर करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सिडनीमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन जाहीर करण्यात आली आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक बदल केला आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेडच्या जागी उस्मान ख्वाजाला, तर इंग्लंडने ऑली रॉबिन्सनच्या जागी स्टुअर्ट ब्रॉडचा (Stuart Broad) समावेश केला आहे. ट्रॅव्हिस हेडने कोरोनामुळे माघार घेतली आहे. दुसरीकडे, ऑली रॉबिन्सन खांद्याच्या समस्येमुळे सिडनी कसोटीतून बाहेर पडला आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया (Australia) 3-0 ने आघाडीवर आहे. त्यांनी ब्रिस्बेन, अॅडलेड आणि मेलबर्न (Melbourne) येथे विजय नोंदवून मालिका आणि ट्रॉफी जिंकली आहे.

दरम्यान, जोश हेझलवूड सिडनी कसोटीसाठी पुनरागमन करेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. परंतु तो अजून तयार नाही. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापनाने स्कॉट बोलँडवरच विश्वास दाखवला आहे. बोलॅंडने मेलबर्न कसोटीतून पदार्पण केले असून पहिल्याच सामन्यात त्याला सामनावीराचा किताब मिळाला. त्याने दुसऱ्या डावात सात धावांत सहा बळी घेतले. यामुळे इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला होता. ट्रॅव्हिस हेडच्या बाहेर पडणे ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का असेल. अॅशेस 2021 मध्ये तो सर्वाधिक धावा करणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. त्याने एक शतक आणि अर्धशतकाच्या जोरावर 248 धावा केल्या आहेत.

रॉबिन्सनचे जाणे म्हणजे इंग्लंडसाठी मोठा धक्का

इंग्लंडबद्दल (England) बोलायचे झाले तर या मालिकेत आतापर्यंत त्यांच्यासाठी काहीही योग्य ठरलेले नाही. त्यांची फलंदाजी किंवा गोलंदाजी आत्तापर्यंत चालली नाही. स्टुअर्ट ब्रॉडला या मालिकेत आतापर्यंत तीनपैकी एकच कसोटी खेळायला मिळाली आहे. सिडनीमध्येही रॉबिन्सनच्या दुखापतीमुळे ब्रॉडला संधी मिळाली. आतापर्यंत केवळ रॉबिन्सनलाच इंग्लंडकडून गोलंदाजीमध्ये यश मिळाले आहे. त्याने तीन कसोटीत नऊ विकेट्स घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन-

मार्कस हॅरिस, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन-

हसीब हमीद, जॅक क्रोली, डेव्हिड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, मार्क वुड, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

Goa Opinion: ‘गोंयकारांनी’ घरांसाठी सरकारी दयेवर अवलंबून राहावे का?

Diwali In Goa: 'तिखशे फोव, वझ्या’त खाजीचे लाडू, फेणोरी, चुरमो'! गोव्यातील आगळीवेगळी दिवाळी

SCROLL FOR NEXT