Arlem Club wins Dainik Gomantak
क्रीडा

आर्लेमने जिंकला नंदा लोलयेकर करंडक

विजय क्रिकेट क्लबवर सहा विकेट्सनी विजय नोंदवून 40व्या नंदा लोलयेकर करंडक क्रिकेट स्पर्धेत विजयी

दैनिक गोमन्तक

पणजी ः आर्लेम क्लबने अंतिम लढतीत विजय क्रिकेट क्लबवर सहा विकेट्सनी विजय नोंदवून 40व्या नंदा लोलयेकर करंडक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळविले. माशे क्रिकेट (Cricket) क्लबच्या या स्पर्धेतील सामना रविवारी माशे-काणकोण येथील निराकार मैदानावर झाला.

आर्लेम क्लबने नाणेफेक जिंकून विजय क्लबला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. फिरकी गोलंदाज शेरबहादूर यादवच्या (5-30) भेदक माऱ्यासमोर विजय क्लबचा डाव 160धावांत गुंडाळला गेला. त्यांच्या रजत शेट याने सर्वाधिक 63धावा केल्या. आर्लेम क्लबने 28 षटकांत 4 बाद 163 धावा करून सामना जिंकला. राजशेखर हरिकांतने अर्धशतक (56) केले.

पद्मश्रीचे निवड झालेले फुटबॉलपटू (Football) ब्रह्मानंद शंखवाळकर, स्पर्धेचे पुरस्कर्ते कॉमनवेल्थ डेव्हलपर्सचे संचालक चिराग नाईक, प्रशांत नाईक, यांच्या उपस्थिती बक्षीस वितरण झाले.

संक्षिप्त धावफलक ः विजय क्रिकेट क्लब ः 32 षटकांत सर्वबाद 160 (रजत शेट 63, आयुष वेर्लेकर 27, शेरबहादूर यादव 5-30, अंत्रज हितामगिरी 2-21) पराभूत वि. आर्लेम क्लब ः 28 षटकांत 4 बाद 163 (राजशेखर हरिकांत 56, अचित शिगवण 39, शुभम गजिनकर 22 धावा, अमित यादव, श्रेयस उसगावकर, सुजय नाईक प्रत्येकी 1 बळी).

वैयक्तिक बक्षिसे ः कौशल हट्टंगडी (उत्कृष्ट फलंदाज), सनिकेत पालकर (उत्कृष्ट गोलंदाज), शेरबहादूर यादव (अंतिम सामन्याचा मानकरी), अचित शिगवण (स्पर्धेचा मानकरी).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT