Arjun Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याकडून खेळण्यासाठी Arjun Tendulkar ने MCA कडे मागितली NOC

Goa Cricket: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत आहे.

दैनिक गोमन्तक

Arjun Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबईचा संघ सोडण्याच्या तयारीत आहे. पुढील देशांतर्गत हंगामात तो गोव्याकडून खेळताना दिसू शकतो. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघाचा भाग राहिला आहे. 2020-21 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही त्याने हरियाणा आणि पुद्दुचेरीविरुद्ध मुंबईसाठी दोन सामने खेळले आहेत.

दरम्यान, ज्युनियर तेंडुलकरने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ना-हरकत प्रमाणपत्रासाठी (NOC) अर्ज केल्याचे समजत आहे. एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंटने एका निवेदनात म्हटले आहे की, “करिअरच्या या टप्प्यावर अर्जुनसाठी जास्तीत जास्त वेळ मैदानावर घालवणे गरजेचे आहे. आम्हाला विश्वास आहे की, दुसऱ्या स्थानावर खेळल्याने अर्जुनला अधिक स्पर्धात्मक सामने खेळण्याची संधी मिळेल. तो त्याच्या क्रिकेट (Cricket) कारकिर्दीची सुरुवात नव्याने करत आहे.''

अर्जुन भारताच्या अंडर-19 संघाकडून खेळला

अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) तीन हंगामापूर्वी भारताच्या अंडर-19 संघाकडून श्रीलंकेविरुद्ध दोन सामने खेळले होते. त्यावेळी मुंबईच्या मर्यादित षटकांच्या संभाव्य संघातही त्याचा समावेश होता. अर्जुनसाठी सर्वात मोठी निराशा म्हणजे, या मोसमात त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी न मिळाल्याने मुंबई संघातून वगळण्यात आले. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (Goa Cricket Association) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'अर्जुन तेंडुलकरचा राज्यातील संभाव्य खेळाडूंमध्ये समावेश केला जाऊ शकतो.'

'सराव सामन्यातील कामगिरीच्या आधारे संघात स्थान दिले जाईल'

जीसीएचे अध्यक्ष सूरज लोटलीकर (Suraj Lotlikar) म्हणाले, “आम्ही डावखुरा वेगवान गोलंदाज शोधत होतो. म्हणूनच आम्ही अर्जुन तेंडुलकरला गोवा संघात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. हंगामापूर्वी आम्ही मर्यादित षटकांचे सराव सामने खेळू आणि तो या सामन्यांमध्ये खेळेल. या सामन्यातील त्याच्या कामगिरीच्या आधारे निवड समिती त्याला संघात ठेवण्याचा निर्णय घेईल.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT