Teacher Annie Lobo (Badminton Tournament for teachers) Dainik Gomantak
क्रीडा

Badminton स्पर्धेत एनी लोबो हिला तिहेरी मुकुट

शिरोडयाच्या सेंट जोसेफ हायस्कूलला सांघिक विजेतेपद तर उपविजेतेपद सिम्बॉयसिस स्कुलला प्राप्त झाले

Dainik Gomantak

मडगाव: शिरोडा येथील शिवग्राम शाळा समूहाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत (Badminton Tournament) काराय शिरोडा येथील सेंट जोसेफ हायस्कूलने (Winner St. Joseph High-school, Shiroda) सांघिक विजेतेपद जोडले. त्यांच्या एनी लोबो (Teacher Annie Lobo) या शिक्षिकेला विजेतेपदांचा तिहेरी मुकुट प्राप्त झाला.

या स्पर्धेचे उपविजेतेपद शिरोडा येथील सिम्बॉयसिस स्कुलला प्राप्त झाले.या स्पर्धेत या दोन शाळा व्यतिरिक्त शिरोडा उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रह्मदुर्गा विद्यालय, कामाक्षी विद्यालय व कामलादेवी विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता.

या स्पर्धेत सेंट जोसेफच्या एनी लोबो हिने महिला एकेरीत विजय मिळवितानाच महिला दुहेरीत एनी व्हाझ हिच्यासह तर मिश्र दुहेरीत आग्नेल परेरा यांच्या जोडीने विजेतेपद पटकावले. पुरुष एकेरीत याच शाळेतील आग्नेल परेरा यांनी विजेतेपद पटकावले. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक एरव्हीन कुलासो आणि व्यवस्थापक फा. लेस्ली रेगो यांनी अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT