Anjali Sarvani Dainik Gomantak
क्रीडा

INDW vs AUSW: पदार्पण करताच अंजलीने रचला इतिहास! 'हा' विक्रम करणारी पहिलीच भारतीय

भारतीय महिला संघाकडून अंजली सारवानीचे आज पदार्पण झाले.

Pranali Kodre

INDW vs AUSW: भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात शुक्रवारपासून ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी ग्राऊंडवर होत आहे. दरम्यान, या सामन्यातून भारताकडून २५ वर्षीय अंजली सारवाणी हिचे पदार्पण झाले आहे.

अंजली भारतीय महिला संघाकडून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी एकूण ७२ वी खेळाडू ठरली आहे. तिला तिच्या पदार्पणाची कॅप भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्यातर्फे देण्यात आली.

(Anjali Sarvani makes her debut for India Women cricket team.)

अंजलीने नजीकच्या काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली होती. त्याचेच बक्षीस म्हणून तिला भारतीय संघात संधी मिळाली आणि आता तिचे पदार्पणही झाले आहे. अंजली डावखरी वेगवान गोलंदाज असून रेल्वेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते.

तसेच ती पदार्पण करताच भारतीय महिला संघाकडून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये खेळणारी पहिली डावखरी वेगवान गोलंदाज ठरली आहे.

अंजलीने आंतरराज्य महिला टी२० स्पर्धेत ५.७० च्या सरासरीने आणि ३.३४ च्या इकोनॉमी रेटने १७ विकेट्स घेतल्या होत्या. या स्पर्धेत ती सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज होती. तसेच तिने आंतर-विभागीय टी२० स्पर्धेत १० विकेट्स घेतल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT