Rapid Chess Rating Tournament Dainik Gomantak
क्रीडा

Chess tournament : 9 पैकी 9 गुण; अमेय अवदीला रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद

मंदार लाड उपविजेता, नीतिश बेलुरकरला तिसरा क्रमांक

गोमन्तक डिजिटल टीम

Chess tournament : गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर अमेय अवदी याने धडाकेबाज खेळ करताना सर्व नऊही डाव जिंकून व्यंकटेश आणि सुमती शानभाग स्मृती अखिल भारतीय रॅपिड बुद्धिबळ मानांकन स्पर्धेत विजेतेपद मिळविले. वर्चस्व अबाधित राखताना त्याने शेवटच्या फेरीत रुबेन कुलासो याच्यावर मात केली.

मंदार लाड व इंटरनॅशनल मास्टर नीतिश बेलुरकर या गोमंतकीय बुद्धिबळपटूंचे समान आठ गुण झाले. टायब्रेकर गुणांत मंदारला उपविजेतेपद मिळाले, तर नीतिशला तिसरा क्रमांक मिळाला. मुरगाव तालुका बुद्धिबळ संघटनेने गोवा बुद्धिबळ अस्थायी समितीच्या मान्यतेने मांगोर हिल-वास्को येथील सेंट तेरेझा हायस्कूल सभागृहात स्पर्धा घेतली. शानभाग कुटुंबीय प्रतिष्ठानतर्फे स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली होती.

रुबेन कुलासोला चौथा, ग्रँडमास्टर आर. आर. लक्ष्मण याला पाचवा, तर अनिरुद्ध देशपांडे, इंटरनॅशनल मास्टर बाल सुब्रम्हण्यम, सौरव खेर्डेकर, वसंत नाईक, एम. विनय कुमार यांना अनुक्रमे सहावा ते दहावा क्रमांक मिळाला. हरिसुया गुंडेपुडी, सोहन दातार, के. एन. गोपाळ, कोनाथन स्नेहिल, अनिरुद्ध पार्सेकर, पार्थ साळवी, देवेश नाईक, दत्ता कांबळी, विश्वेश कोचरेकर, रशियन दिमित्री बेझस्त्राखोव यांना अनुक्रमे 11वा ते 20वा क्रमांक मिळाला.

राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर, सुकांत शानभाग, किशोर बांदेकर, मुकुंद कांबळी, पुंडलिक नाईक यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. मुकेश अधिया यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT