Ajinkya Rahane Dainik Gomantak
क्रीडा

WTC Final 2023: अजिंक्य राहणे WTC फायनलमध्ये करणार मोठा कारनामा, अशी कामगिरी करणारा ठरणार...

Ajinkya Rahane Indian Cricket Team: भारतीय संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये शानदार कामगिरी केली.

Manish Jadhav

Ajinkya Rahane Indian Cricket Team: भारतीय संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये शानदार कामगिरी केली. त्याने चेन्नई सुपर किंग्जसाठी अनेक मॅच विनिंग इनिंग खेळल्या.

त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळेच त्याला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघात स्थान मिळाले. आता तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या WTC फायनलमध्ये मोठा विक्रम करु शकतो. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया...

टीम इंडियात पुन्हा परतला

दरम्यान, अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. पहिल्या सामन्यापासूनच, तो आपल्या शानदार कामगिरीने सर्वांना प्रभावित करु शकला. विशेष म्हणजे, त्याने टीम इंडियाला अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले.

पण त्याच्या कारकिर्दीत एक वाईट टप्पाही आला. जेव्हा त्याच्या बॅटमधून धावा येणे बंद झाले होते. यानंतर, त्याला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

त्याने भारतासाठी शेवटचा सामना 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. पण आता त्याला पुन्हा एकदा टीम इंडियात स्थान मिळाले आहे.

एक झेल घेताच मोठा किर्तीमान करेल

अजिंक्य रहाणेने भारताकडून आतापर्यंत 82 कसोटी सामन्यांमध्ये 99 झेल घेतले आहेत. जर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणखी एक झेल घेतला तर तो कसोटीत त्याचे 100 झेल पूर्ण करेल. राहुल द्रविडने (Rahul Dravid) सर्वाधिक झेल घेतले आहेत. त्याने 209 झेल टिपले आहेत.

तर रोहित शर्माने 49 कसोटी सामन्यात 50 झेल घेतले आहेत. त्याचबरोबर, केएल राहुलने 53 झेल घेतले आहेत.

भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू:

राहुल द्रविड - 209 झेल

व्हीव्हीएस लक्ष्मण - 135 झेल

सचिन तेंडुलकर - 115 झेल

विराट कोहली - 109 झेल

सुनील गावस्कर - 108 झेल

मोहम्मद अझरुद्दीन - 105 झेल

अजिंक्य रहाणे - 99 झेल

इतक्या धावा करताच...

अजिंक्य रहाणेने आतापर्यंत 82 कसोटीत 39.52 च्या सरासरीने 4931 धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने 12 शतके आणि 25 अर्धशतके केली आहेत. रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणखी 69 धावा केल्या तर तो कसोटी क्रिकेटमधील 5000 धावा पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा तो 12वा भारतीय फलंदाज ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT