Aishwarya Jadhav Dainik Gomantak
क्रीडा

Open Tennis Tournament : गास्पार डायस टेनिस स्पर्धेत ऐश्वर्या जाधवने पटकावला तिहेरी किताब

पुरुष एकेरीत काफिल कडवेकर विजेता, दुहेरीत विक्रांत-सिद्धांतची बाजी

किशोर पेटकर

Open Tennis Tournament : ऐश्वर्या जाधव हिने गास्पार डायस खुल्या टेनिस स्पर्धेत तिहेरी किताब पटकावला. तिने 16 वर्षांखालील मुलींत, मिश्र दुहेरीत, तसेच महिला एकेरीत विजेतेपद मिळविले. काफिल कडवेकर पुरुष एकेरीत विजेता ठरला, तर विक्रांत तांडले व सिद्धांत देशपांडे जोडीने पुरुष दुहेरीत बाजी मारली.

स्पर्धा मिरामार येथील क्लब टेनिस द गास्पार डायस कोर्टवर झाली. अगोदर 16 वर्षांखालील मुलींच्या एकेरीत विजेतेपद मिळविलेल्या ऐश्वर्याने महिला एकेरीच्या अंतिम लढतीत प्राप्ती हिच्यावर फक्त एका गेमच्या मोबदल्यात 6-0, 6-1असा विजय मिळविला.

नंतर मिश्र दुहेरीतील अटीतटीच्या अंतिम लढतीत ऐश्वर्या व अर्षद देसाई जोडीने काफिल व प्राप्ती जोडीवर 2-6, 7-6, 10-7 अशी मात केली.

काफिल टायब्रेकरमध्ये सरस

पुरुष एकेरीत काफिल याला अश्विन नरसिंघानी याने झुंजविले. अखेरीस दोन्ही टायब्रेकर सेटमध्ये काफिल 7-6, 7-6 असा सरस ठरला. मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीत विक्रांत व सिद्धांत जोडीने तेजस शेवडे व निषाद शेवडे जोडीस 3-6, 6-2, 10-5 असे हरविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT