Ruturaj Gaikwad Dainik Gomantak
क्रीडा

Ruturaj Gaikwad 7 Sixes: 'पाचव्या षटकारानंतर फक्त त्याच व्यक्तीचा विचार आला' ऋतुराजने मांडल्या भावना

ऋतुराज गायकवाडने सलग 7 षटकार मारताना काय भावना होत्या, याबद्दल खुलासा केला आहे.

Pranali Kodre

महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याने 28 नोव्हेंबर रोजी विजय हजारे ट्रॉफी 2022 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात उत्तर प्रदेशविरुद्ध 220 धावांची विक्रमी द्विशतकी खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने सलग 7 षटकार मारण्याचाही पराक्रम नोंदवला. या खेळीबद्दल ऋतुराजने आपल्या भावना बीसीसीआयशी बोलताना व्यक्त केल्या आहेत.

ऋतुराजने महाराष्ट्राच्या डावातील 49 व्या षटकात एका नो बॉलवरील षटकारासह सलग 7 षटकार मारत 42 धावा केल्या होत्या. या खेळी दरम्यान त्याला युवराज सिंगच्या 6 षटकारांची आठवण झाल्याचे त्याने मान्य केले आहे. युवराजने (Yuvraj Singh) 2007 टी20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध एका षटकात सलग 6 षटकार मारले होते.

ऋतुराज (Ruturaj Gaikwad) म्हणाला, 'खरं सांगायचं तर पाचवा षटकार मारल्यानंतर माझ्या डोक्यात फक्त एका व्यक्तीचा विचार येऊन गेला, तो व्यक्ती म्हणजे युवराज सिंग. मी लहान असताना त्याला 2007 टी20 वर्ल्डकपमध्ये एका षटकार 6 षटकार मारताना पाहिले होते.'

'मला त्याच्या पंक्तीत बसायचे होते. त्याचमुळे मी सहावा षटकारही मारला. मी कधीही विचार केला नव्हता, अगदी स्वप्नातही की मी सलग सहा षटकार मारू शकतो. युवराजच्या पंक्तीत बसण्याचा आनंद खूप मस्त आहे.'

ऋतुराज पुढे म्हणाला, 'जेव्हा मी सहावा षटकार मारला, तेव्हा विचार केला की सातव्या षटकारासाठीही जायला हवं. त्या षटकात आणि संघासाठी शक्य तेवढे जास्त धावा करण्याचा प्रयत्न होता. ही एक मूळ योजना होती आणि मला आनंद आहे की ती पूर्ण झाली.'

याबरोबरच ऋतुराजने ही खेळी संघसहकारी, कुटुंब आणि महाराष्ट्रातील लोकांना समर्पित केली आहे.

ऋतुराज हा लिस्ट ए क्रिकेटमध्ये सलग 7 षटकार मारणारा पहिला क्रिकेटपटू आहे. तसेच लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा महाराष्ट्र संघातील पहिला खेळाडू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT