Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

संघाच्या विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने केले शुभमनचे कौतुक

गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा 62 धावांनी पराभव केला.

दैनिक गोमन्तक

गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा 62 धावांनी पराभव केला. शुभमन गिलने IPL 2022 च्या 57 व्या सामन्यात गुजरातसाठी चमकदार कामगिरी केली. त्याने 63 धावांची नाबाद खेळी खेळली. संघाच्या विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) शुभमनचे खूप कौतुक केले. (Lucknow Super Giants vs Gujarat Titans)

संघाच्या 62 धावांच्या विजयानंतर हार्दिक म्हणाला, "प्रत्येकाने ज्या प्रकारे फलंदाजी केली, विशेषत: शुभमन, मला असे वाटले की 145 धावा केल्यानंतर, आम्हाला चांगली संधी मिळेल. माझ्या मते त्यांच्या गोलंदाजांनी थोडी कमी गोलंदाजी केली. फुल लेंथ बॉल्सवर चांगले परिणाम येत होते. आम्ही गटात फक्त एकच गोष्ट बोललो की ते फक्त दोन शॉट्सवर धावा काढू शकतात." (IPL 2022)

सुस्थितीत असतानाही शेवटचा सामना हरल्यानंतर सहकारी खेळाडूंशी बोललो होतो, असे हार्दिकने सांगितले. तो म्हणाला, “14 व्या सामन्यापूर्वी पात्रता मिळवणे खूप छान आहे, हा एक चांगला प्रयत्न आहे आणि आम्हाला स्वतःचा अभिमान आहे. मैदानावर जाण्यापूर्वी मी शेवटच्या सामन्याबद्दल सहकारी खेळाडूंशी चर्चा केली. मला वाटते की आम्ही जिंकलेल्या सर्व सामन्यांमध्ये आमच्यावर दबाव होता. शेवटचा सामना हा एकमेव सामना होता ज्यात आम्ही चांगल्या स्थितीत होतो आणि आमच्याकडे असलेल्या फलंदाजाच्या स्किलवर आम्ही तो सामना जिंकायला हवा होता. पण असे झाले नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT