T-20

 

Dainik Gomantak

क्रीडा

तालिबानचा नवा डाव अफगाणिस्तानच्या खेळाडूंना घातली बंधने!

ACB आपल्या खेळाडूंना फक्त तीन लीगमध्ये भाग घेण्याची परवानगी देईल जेणेकरून ते राष्ट्रीय संघासाठी उपलब्ध असतील आणि देशांतर्गत क्रिकेट खेळू शकतील.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू (Afghan cricketer) जगभरातील वेगवेगळ्या T-20 लीगमध्ये भाग घेऊन स्वतःचे नाव झळकवत आहेत. अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खान (Rashid Khan) हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. आता राशिद T-20 लीगपेक्षा देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे. अफगाणिस्तान (Afghanistan) क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना लगाम घालण्याच्या तयारीत आहे. ACB आपल्या खेळाडूंना फक्त तीन लीगमध्ये भाग घेण्याची परवानगी देईल जेणेकरून ते राष्ट्रीय संघासाठी उपलब्ध असतील आणि देशांतर्गत क्रिकेट खेळू शकतील.

ACB ने 14 सदस्यांची एक तांत्रिक समिती स्थापन केली आहे, जी सध्याची क्रिकेट रचना पाहून संघाचा स्तर कसा उंचावायचा हे ठरवणार आहे. ही समिती एकत्रित बैठक घेऊन एसीबीच्या उच्च व्यवस्थापनाला अहवाल देईल. अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू जवळपास प्रत्येक मोठ्या T20 लीगमध्ये भाग घेतात, ज्यामध्ये ते सहसा सहभागी होण्यासाठी देशांतर्गत स्पर्धांना महत्त्व देत नाहीत. एसीबीला यामध्ये बदल घडवून आणायचा आहे.

ACB च्या विशेष समिती सदस्य रईस अहमदजादी यांनी क्रिकबझला सांगितले की, “आमचा संघ एक योजना तयार करत आहे की, आमच्या राष्ट्रीय संघातील खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी कसे बोलावले जाईल. फ्रँचायझी लीगमध्ये खेळाडूंच्या सहभागाबाबत बोर्ड मोठा निर्णय घेईल. खेळाडूंना फक्त तीन T-२० लीगमध्ये भाग घेता येईल आणि ते कोणत्या तीन लीग असतील ते निवडू शकतील. सर्व कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये क्रिकेटची प्रथम श्रेणी महत्त्वाची आहे आणि आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डालाही तोच मार्ग अवलंबायचा आहे.

T-20 संघांची निवड करणे सोपे आहे कारण आमचे खेळाडू अनेक लीगमध्ये खेळतात. मात्र, जेव्हा आपले अव्वल खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत नाहीत, तेव्हा चांगले खेळाडू तयार होणार नाहीत. मला खात्री आहे की पुढील वर्षापासून 90 टक्के क्रिकेटपटू देशांतर्गत क्रिकेटचा भाग असतील. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटचा स्तर उंचावण्यासाठी परदेशातून पिच क्युरेटर्सना बोलावले जाईल जेणेकरून लॉकर कर्मचारी वेगवान गोलंदाजांसाठी योग्य खेळपट्ट्या तयार करू शकतील. पुढील FTP पर्यंत अफगाणिस्तान 37 एकदिवसीय, 12 टी-20 आणि तीन कसोटी सामने खेळणार आहे. याशिवाय लाह आयसीसी आणि आशिया क्रिकेट कौन्सिल टूर्नामेंटमध्येही सहभागी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT