Afghanistan Cricket 
क्रीडा

AFG vs PAK: पाकिस्तानला पराभूत केलेच, पण अफगाणिस्तानने भारताचा 20 वर्षे जुना विक्रमही मोडला

World Cup 2023: सोमवारी अफगाणिस्तानने वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करताना भारताच्या एका विक्रमालाही धक्का दिला.

Pranali Kodre

Afghanistan break India 20 years old record after beating Pakistan by 8 wickets in ICC ODI Cricket World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सोमवारी (23 ऑक्टोबर) अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान संघात सामना झाला. चेन्नईला झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने 8 विकेट्सने विजय मिळवत मोठा उलटफेर केला.

या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानसमोर 283 धावांचे अव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग अफगाणिस्तानने 49 षटकात 2 विकेट्स गमावत 286 धावा करत पूर्ण केले. त्यामुळे अफगाणिस्तानने भारताचाही विक्रम मोडला आहे.

वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या संघांच्या यादीत आता अफगाणिस्तान अव्वल क्रमांकावर आला आहे. यापूर्वी हा विक्रम भारताच्या नावावर होता.

भारताने 20 वर्षांपूर्वी म्हणजेत 2003 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सेंच्युरियनला झालेल्या सामन्यात 274 धावांचे यशस्वी आव्हान पूर्ण केले होते. पण हा विक्रम सोमवारी अफगाणिस्तानने 283 धावांचे लक्ष्य पूर्ण करत मोडला.

  • वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग करणारे संघ -

    • 283 धावा - अफगाणिस्तान, चेन्नई, 2023

    • 274 धावा - भारत, सेंच्युरियन, 2003

    • 267 धावा - वेस्ट इंडिज, बर्मिंगघम, 1975

    • 243 धावा - दक्षिण आफ्रिका, कराची, 1996

अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय

दरम्यान, सोमवारी अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदाच वनडेत विजय मिळवला. यासामन्याआधी या दोन संघात 7 वनडे सामने झालेले, जे पाकिस्तानने जिंकले होते. तसेच अफगाणिस्तानने त्यांच्या वनडे इतिहासात सर्वात मोठे धावांचे लक्ष्यही पार करण्याचा पराक्रम केला आहे.

अफगाणिस्तानचा विजय

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 282 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 74 धावा केल्या. तसेच अब्दुल्ला शफिकने 58 धावांची खेळी केली, तर शादाब खान आणि इफ्तिखार अहमद यांनी प्रत्येकी 40 धावा केल्या.

अफगाणिस्तानकडून नूर अहमदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर नवीन-उल-हकने 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मोहम्मद नबी आणि अझमतुल्लाहने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर 283 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानकडून सलामीवीर रेहमनुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम झाद्रान यांनी 130 धावांची भागीदारी केली. तसेच अर्धशतकेही झळकावली. गुरबाजने 65 धावा केल्या, तर झाद्रानने सर्वाधिक 87 धावांची खेळी केली.

हे दोघे बाद झाल्यानंतरही रेहमत शाह आणि कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी यांनी पाकिस्तानी गोलंदाजांना यश मिळू न देता अफगाणिस्तानचा विजय पक्का केला. रेहमत शाहने नाबाद 77 धावा केल्या, तर शाहिदीने नाबाद 48 धावा केल्या.

पाकिस्तानकडून शाहिन शाह आफ्रिदी आणि हसन अली यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT