AFC Champions League FC Goa hopes to benefit in the upcoming season
AFC Champions League FC Goa hopes to benefit in the upcoming season 
क्रीडा

AFC Champions League: एफसी गोवास आगामी मोसमात लाभ होण्याची आशा

दैनिक गोमंतक

पणजी : आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत (AFC Champions League) खेळून नवा आत्मविश्वास गवसला असून त्याचा लाभ एफसी गोवा संघाला इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात खेळताना निश्चितच होईल, असे मत संघाचा अनुभवी मध्यरक्षक ब्रँडन फर्नांडिस (Brandon Fernandes) याने व्यक्त केले आहे.

गोव्यातील फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एएफसी चँपियन्स लीग स्पर्धे दरम्यान ई गटातील सामने झाले. 14 ते 29 एप्रिल या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत एफसी गोवाने तीन गुणांसह इराणच्या पर्सेपोलिस व संयुक्त अरब अमिरातीचा अल वाहदा क्लबनंतर तिसरा क्रमांक मिळविला. एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळण्याची एफसी गोवाची ही पहिलीच वेळ होती. (AFC Champions League FC Goa hopes to benefit in the upcoming season)

वैयक्तिक पातळीवर 26 वर्षीय गोमंतकीय मध्यरक्षक ब्रँडनसाठी ही स्पर्धा स्वप्नवत ठरली. स्पर्धेतील सहा सामन्यांत मिळून एफसी गोवाने दोन गोल नोंदविले आणि दोन्ही वेळेस ब्रँडनचे असिस्ट यशस्वी ठरले. स्पर्धेत खेळल्याने आमचा आत्मविश्वास उंचावला आहे, त्यात दुमत नाही, असे ब्रँडनने `इंडियनसुपरलीग डॉट कॉम`ला सांगितले.

``चुका करण्याचा स्तर खूप कमी असेल आणि सर्वोत्तम क्षमता प्रदर्शित करायची आहे हे आम्हाला माहीत होते, त्यासाठी सूर गवसणे आवश्यक होते. जे आम्ही करू शकलो,`` असे ब्रँडन म्हणाला. ``आमच्या क्षमतेवरील विश्वास, तसेच आत्मविश्वासही कमालीचा उंचावला आहे, त्याचा लाभ आगामी मोसमात होईल,`` असे 10 क्रमांकाच्या जर्सीत खेळणाऱ्या मध्यरक्षकाने नमूद केले.

एफसी गोवाचा अनुभवी मध्यरक्षक

ब्रँडन 2017 पासून एफसी गोवातर्फे खेळत असून त्याने या क्लबचे आयएसएल स्पर्धेत 62 सामन्यांत प्रतिनिधित्व केले असून 5 गोल आणि 18 अशी कामगिरी केली आहे. यावर्षी एफसी गोवाने त्याचा करार जून 2024 पर्यंत वाढविला आहे. ब्रँडन 2020-21 मोसमात एफसी गोवातर्फे 12 सामने खेळला, दुखापतीमुळे त्याला काही सामन्यांना मुकावे लागले, मात्र एएफसी चँपियन्स लीगसाठी तो पूर्ण क्षमतेने सज्ज झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT