Abhishek Sharma 94 runs 42 balls Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: 8 चौकार, 7 षटकार... IPL 2026 पूर्वी अभिषेक शर्माचा 'रुद्र अवतार', 42 चेंडूत ठोकल्या 94 धावा, पाहा व्हिडिओ

Abhishek Sharma 94 runs 42 balls: टी-२० विश्वचषकातील संमिश्र कामगिरीनंतर अभिषेकने आयपीएलसाठी आपण पूर्णपणे सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.

Sameer Amunekar

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ चा बिगुल वाजण्यास आता काहीच दिवस शिल्लक आहेत. मात्र, मैदानावर प्रत्यक्ष सामने सुरू होण्यापूर्वीच सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) फलंदाजांनी आपल्या फलंदाजीने दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. शनिवारी झालेल्या एका सराव सामन्यात हैदराबादचा धडाकेबाज सलामीवीर अभिषेक शर्माने आपल्या बॅटने आग ओकली. टी-२० विश्वचषकातील संमिश्र कामगिरीनंतर अभिषेकने आयपीएलसाठी आपण पूर्णपणे सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. त्याने अवघ्या ४२ चेंडूंमध्ये ९४ धावांची वादळी खेळी करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

या सराव सामन्यात 'SRH-A' कडून खेळताना अभिषेक शर्माने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्याने आपल्या खेळीत ८ उत्तुंग चौकार आणि ७ गगनचुंबी षटकार खेचले. त्याच्या या फटकेबाजीमुळे संघाने २१ षटकांत २५३ धावांचा डोंगर उभा केला.

अभिषेकसोबतच दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हेनरिक क्लासेनने ३१ चेंडूत ४९ धावा केल्या. मात्र, सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते १.५० कोटींना लिलावात खरेदी केलेल्या सलील अरोराने. २३ वर्षीय सलीलने अवघ्या १६ चेंडूत ४७ धावा कुटल्या. या कामगिरीमुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी सलीलने प्लेइंग इलेव्हनमध्ये आपला दावा मजबूत केला आहे.

ईशान किशनचा 'कॅप्टन' पॅटर्न

दुसरीकडे, पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या ईशान किशननेही आपली चमक दाखवली. 'SRH-B' कडून खेळताना ईशानने केवळ २५ चेंडूंमध्ये ७२ धावांची तुफानी खेळी केली. यंदाच्या हंगामात सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी ईशानवर नेतृत्वाची धुरा असणार आहे आणि सराव सामन्यातील त्याची ही खेळी चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.

गोलंदाजीमध्ये अनुभवी जयदेव उनाडकटने आपली धार दाखवून दिली. त्याने पहिल्या डावात ४८ धावा मोजल्या असल्या तरी, ५ महत्त्वाचे गडी बाद करून आपण आजही लयीत असल्याचे सिद्ध केले.

२८ मार्चच्या महामुकाबल्यासाठी एसआरएच सज्ज

अभिषेक शर्मा सध्या टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. सराव सामन्याच्या दुसऱ्या डावात तो स्वस्तात बाद झाला असला, तरी पहिल्या डावातील त्याची फटकेबाजी प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवणारी होती.

सनरायझर्स हैदराबादचा पहिला सामना २८ मार्च रोजी आरसीबीविरुद्ध होणार आहे. सराव सामन्यातील ही 'पॉवर-पॅक्ड' कामगिरी पाहता, हैदराबादचा संघ यंदाच्या मोसमात पुन्हा एकदा 'टोटल क्रिकेट'चा नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सज्ज असल्याचे दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT