Abhishek Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Abhishek Sharma 100 Sixes In Powerplay T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात नवा इतिहास रचला.

Manish Jadhav

Abhishek Sharma 100 Sixes In Powerplay T20 Record: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी20 सामना क्राइस्टचर्च येथे खेळला गेला. तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डीच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने दुसराही टी20 सामना जिंकला. अशाप्रकारे पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली. दरम्यान, सिक्सर किंग अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात नवा इतिहास रचला.

अभिषेक शर्मासाठी 2026 हे वर्ष अत्यंत शानदार जात असून त्याने मोठ्या सामन्यांमध्ये आपला जलवा दाखवून दिला. या सामन्यात पहिला षटकार मारताच अभिषेक टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पॉवरप्लेदरम्यान 100 षटकार ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. ही ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी त्याने एकूण 776 चेंडूंचा सामना केला, ज्यावरुन पॉवरप्लेमध्ये त्याच्या आक्रमक फलंदाजीचा अंदाज येतो.

या यादीत दुसऱ्या स्थानी माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे, ज्याने पॉवरप्लेमध्ये 98 षटकार मारले असून त्यासाठी त्याने 1672 चेंडूंचा सामना केला. रोहितने टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो आता फक्त वनडेमध्ये खेळतो. दरम्यान, अभिषेक शर्माची टी-20 कारकीर्द आतापर्यंत उत्कृष्ट राहिली असून त्याने संघात सलामीवीर म्हणून आपले स्थान पक्के केले आहे. त्याने 69 सामन्यांमध्ये 32.23 ची सरासरी आणि 193.36 च्या तुफानी स्ट्राइक रेटने 2127 धावा केल्या आहेत. त्याच्या नावे 3 शतके, 14 अर्धशतके आणि तब्बल 147 षटकार जमा आहेत.

मात्र, सध्याच्या घडीला अभिषेक खराब फॉर्मशी झगडत आहे. अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत त्याला केवळ एकाच सामन्यात अर्धशतक झळकावता आले, तर उर्वरित सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यात त्याला उत्तम सुरुवात मिळाल्यानंतर मोठ्या धावसंख्येत रुपांतर करता आले नाही. त्यामुळे आता न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये अभिषेक कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

Goa Weather Update: काणकोणमध्ये वादळी पावसाचा तडाखा! चावडीत झाड कोसळून वाहतूक कोंडी; शेळेरमध्ये घराचे अडीच लाखांचे नुकसान

Goa Agriculture: डिचोलीत परतीच्या पावसाचा भातशेतीला फटका! मयेतील भातपीक आडवे, बळीराजा चिंतेत

SCROLL FOR NEXT