Sharjah Cricket Stadium Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2022: शारजाह क्रिकेट ग्राउंडवर मोठा विक्रम, ऑस्ट्रेलियाच्या सिडनीने मिळवले मोठे स्थान

Sports News: या क्रिकेट मैदानावरील हा 281 वा आंतरराष्ट्रीय सामना होता.

दैनिक गोमन्तक

आशिया कप 2022 सुपर-4 लीग फेरीचा पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान (SL vs AFG 2022) यांच्यात शारजाह येथे खेळला गेला. हे शारजाह क्रिकेट ग्राउंड हा 281 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. अशाप्रकारे, शारजा क्रिकेट मैदानाच्या नावावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांचा विक्रम नोंदवला गेला आहे. यामध्ये शारजा क्रिकेट मैदानाने ऑस्ट्रेलियाच्या सिडनीला मागे टाकले आहे. सिडनीमध्ये आतापर्यंत 280 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत.

ऑस्ट्रेलियाचे सिडनी क्रिकेट मैदान दुसऱ्या क्रमांकावर आहे

आता शारजाह क्रिकेट मैदान (Sharjah Cricket Stadium) सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या बाबतीत 281 सामन्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे सिडनी क्रिकेट ग्राउंड या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सिडनी क्रिकेट मैदानावर आतापर्यंत 280 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. ऑस्ट्रेलियाचे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड 278 सामन्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे आशिया चषक 2022 चे आयोजन UAE मध्ये होत आहे. आशिया चषक 2022 श्रीलंकेत होणार होता, परंतु राजकीय संकटामुळे ते तेथे होऊ शकले नाही. यामुळे आशिया कप 2022 यूएईमध्ये खेळवला जात आहे.

आशिया चषक 2022 मध्ये भारताबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडिया सुपर-4 फेरीत पोहोचली आहे. भारतीय संघाने त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 5 विकेटने पराभव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव केला होता.

त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त श्रीलंका आणि अफगाणिस्तानचा संघ आशिया कप 2022 च्या सुपर-4 फेरीत पोहोचला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला भारताविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र हाँगकाँगचा पराभव करून पाकिस्तानी संघाने सुपर-4 फेरीतील आपले स्थान पक्के केले. आता रविवारी भारत आणि पाकिस्तानचे संघ सुपर-4 फेरीत आमनेसामने येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT