Yuzvendra Chahal Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND 1st T20: वन डेत बाकावर बसवून ठेवले, T-20 मध्ये संधी मिळताच 'या' फिरकीपटूने केला मोठा धमाका

Team India: मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात भारताच्या या दिग्गज खेळाडूने धमाल केली. त्रिनिदादच्या ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर या भारतीय फलंदाजाने 3 चेंडूत 2 बळी घेतले.

Manish Jadhav

WI vs IND 1st T20, Yuzvendra Chahal: भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडिजविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे.

मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात भारताच्या या दिग्गज खेळाडूने धमाल केली. त्रिनिदादच्या ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर या भारतीय फलंदाजाने 3 चेंडूत 2 बळी घेतले.

त्याने पहिल्याच षटकात मोठा धमाका केला

दरम्यान, या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) पहिलेच षटक टाकले. हार्दिक पांड्याने डावाच्या 5 व्या षटकात चहलकडे चेंडू सोपवला. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चहलने काइल मेयर्सला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

त्याने भारतीय संघाला मेयर्सच्या रुपात मोठी विकेट मिळवून दिली. विंडीज संघाची पहिली विकेट 29 धावांवर पडली. त्यानंतर पुढच्या चेंडूवर चार्ल्सने सिंगल घेतली, पण तिसऱ्या चेंडूवर ब्रेंडन किंग (28) एलबीडब्ल्यू आऊट झाला.

यावर किंगने डीआरएसही घेतला पण निर्णय चहलच्या बाजूने गेला. अशाप्रकारे चहलने 3 चेंडूत वेस्ट इंडिजच्या 2 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

186 दिवसांनी टी-20 संघात एन्ट्री

दुसरीकडे, चहलला 186 दिवसांनंतर भारताच्या T20 संघात स्थान मिळाले. याआधी त्याने 29 जानेवारी 2023 रोजी लखनऊमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता. त्याने आयपीएलमध्ये (IPL) राजस्थान रॉयल्ससाठी चांगली कामगिरी केली, त्यामुळे त्याला विंडीज दौऱ्यावर संधी देण्यात आली. जरी तो कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत खेळला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT