Pakistani Cricketer Ayesha Naseem Retirement Dainik Gomantak
क्रीडा

Pakistani Cricketer Ayesha Naseem Retirement: 'इस्लामनुसार जीवन जगायचे आहे...', वयाच्या 18 वर्षीय आयशा नसीमचा क्रिकेटला अलविदा

Ayesha Naseem: पाकिस्तानची स्टार युवा फलंदाज आयशा नसीमने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेऊन सर्वांनाच चकित केले आहे.

Manish Jadhav

Pakistani Cricketer Ayesha Naseem Retirement: पाकिस्तानची स्टार युवा फलंदाज आयशा नसीमने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेऊन सर्वांनाच चकित केले आहे. 18 वर्षीय आयशाने पाकिस्तानसाठी आतापर्यंत चार एकदिवसीय आणि 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

विस्फोटक फलंदाज म्हणून आयशाला ओळखले जाते. तिची क्रिकेटमधून अचानक निवृत्ती ही धक्कादायक आहे. आयशाने सांगितले की, तिला आपले उर्वरित आयुष्य इस्लामनुसार जगायचे आहे आणि म्हणूनच ती क्रिकेटला अलविदा करत आहे.

दरम्यान, आयशाने तिच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 369 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिचा स्ट्राइक रेट 128.12 आहे. आयशाने एकदिवसीय सामन्यात दोन षटकार तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 18 षटकार मारले आहेत.

2020 मध्ये आयशाने पाकिस्तानसाठी पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तर 15 फेब्रुवारी 2023 मध्ये तिने शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तिचा पहिला एकदिवसीय सामना जुलै 2021 मध्ये होता, तर शेवटचा एकदिवसीय सामना जानेवारी 2023 मध्ये होता.

वयाच्या 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले

वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करुन आयशाने सर्वांना चकित केले होते. 2020 मध्ये, ती वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानसाठी (Pakistan) तिचा पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी गेली होती.

मात्र, त्यानंतर सिडनीत थायलंड महिला संघाविरुद्धच्या सामन्याचा निकाल लागला नाही. तिने या वर्षी 15 फेब्रुवारी रोजी केपटाऊनमध्ये आयर्लंडविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

विशेष म्हणजे, तिने टी-20 विश्वचषकातच (T20 World Cup) पदार्पण केले आणि टी-20 विश्वचषकातच या फॉरमॅटमधील शेवटचा सामना खेळला. तिचा पहिला एकदिवसीय सामना जुलै 2021 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध होता, तर शेवटचा एकदिवसीय सामना जानेवारी 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: ‘वुमन सेफ्टी अँड सिनेमा’ सत्रात मान्यवरांची ‘सेफ बॅटिंग’! 'पॉवर प्ले आहे पण..', भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT