Kissing Side Effects Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kissing Side Effects: अरे बापरे! किस केल्याने तुम्हाला होऊ शकतात अनेक आजार; एकदा वाचाच

जोडपी आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी चुंबनाचा अवलंब करतात

Kavya Powar

Kissing Side Effects: प्रेम करण्याचे अनेक मार्ग असले तरी अनेकदा जोडपी आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी चुंबनाचा अवलंब करतात. यामुळे तुमचे नाते मजबूत होते. किस हा एक भावनिक संबंध आहे. किस करण्याचे अनेक फायदे आहेत.

पण एक सत्य हे देखील आहे की किस केल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे आजार देखील होऊ शकतात. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल..

किस केल्यामुळे हे आजार होऊ शकतात...

सिफिलीस

सिफिलीस हा एक जिवाणू संसर्ग आहे, जो सहसा चुंबनाने पसरत नाही. तो ओरल सेक्स द्वारे पसरतो. सिफिलीसमुळे तोंडात फोड येतात आणि चुंबनाने जीवाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातात. योग्य औषधांनी हा आजार बरा होऊ शकतो. यामध्ये ताप, घसा खवखवणे, लिम्फ नोड्सची सूज यासारख्या समस्या दिसून येतात

इन्फ्लुएन्झा

श्वसनाचे आजार, इन्फ्लुएंझा किंवा फ्लू हे चुंबनामुळे देखील होऊ शकतात. या समस्येमध्ये स्नायू दुखणे, घशात संसर्ग होणे, ताप येणे अशी लक्षणे दिसतात.

नागीण

यामुळे नागीण ही समस्या देखील होऊ शकते. सामान्यतः नागीण विषाणूचे दोन प्रकार असतात. HSV 1 आणि HSV2. हेल्थ लाईनच्या अहवालानुसार, ज्याद्वारे HSV 1 विषाणू सहज पसरू शकतो. तोंडात लाल किंवा पांढरे फोड येणे ही त्याची सर्वात प्रमुख लक्षणे मानली जातात.

हिरड्यांची समस्या

जोडीदाराला हिरड्या आणि दातांची समस्या असेल तर चुंबन घेतल्याने तुम्हाला देखील ही समस्या उद्भवू शकते. जर निरोगी व्यक्ती लाळेच्या माध्यमातून बॅक्टेरियाच्या संपर्कात आली तर हिरड्यांना सूज येण्याची समस्या असू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT