Yoga Mantra Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Yoga to Improve Eyesight: डोळ्यांना निरोगी ठेवायचं असेल तर करा 'हे' 3 योगासन

डोळे कमकुवत किंवा थकल्यासारखे वाटत असतील तर आपल्याला देखील फ्रेश वाटत नाही.

दैनिक गोमन्तक

Yoga to Improve Eyesight: शरीराच्या प्रत्येक अवयवाची काळजी घेणे गरजेचे असते. तसेच चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यात डोळ्यांची खास काळजी घेणे गरजेचे असते. पण हे डोळे कमजोर किंवा थकलेले दिसले तर चेहरा फ्रेश दिसत नाही.

तुम्हालाही तुमच्या चेहऱ्याचा आणि डोळ्यांचा तेज निरोगी ठेवायचा असेल, तर तुमच्या रूटीनमध्ये या 3 योगासनांचा समावेश करा.

  • सर्वांगासन

सर्वांगासन करण्यासाठी सर्वात पहिले योगा मॅटवर शवासनात झोपावे. यानंतर दोन्ही हात मांड्या आणि तळवे जमिनीवर ठेवून, पाय गुडघ्यांपासून वाकवा आणि पाठ खांद्यापर्यंत उचला. दोन्ही हात कमरेच्या खाली ठेऊन शरीराच्या उंचावलेल्या भागाला आधार देत हनुवटी छातीला चिकटवावी. हे करत असताना सतत श्वास घेत राहावे.

यानंतर पाय गुडघ्यातून वाकवून कपाळाजवळ परत आणताना हात जमिनीवर ठेवून हळूहळू शरीर आणि पाय शवासनामध्ये आणा. हा योगा करतांना डोळे उघडे ठेवा. असे कल्याने डोळ्यांचा तेज वाढतो आणि व्यक्तीची चिडचिडही दूर होते.

Sarvangasana
  • शवासन

शवासन करण्यासाठी सर्वप्रथम योग मॅटवर पाठीवर शांतपणे झोपावे. यानंतर आपले पाय सैल सोडून, आपले खांदे शरीराच्या जवळ ठेवा. हे करत असताना तुमचे शरीर जमिनीवर पूर्णपणे स्थिर होऊ द्या. हे आसन केल्याने शरीराचा थकवा दूर होण्यासोबतच डोळ्यांनाही आराम मिळतो.

Shavasana
  • प्राणायाम

प्राणायाम करण्यासाठी पहिले पद्मासन आणि सिद्धासनाच्या आसनात बसावे. असे केल्याने मन स्थिर राहण्यासोबतच दृष्टीही चांगली राहण्यास मदत मिळते.

Pranayam
  • या गोष्टी ठेवा लक्षात

योगा करत असतांना मान सरळ ठेवावी. डोळ्यांचे बुबुळ आधी 4-6 वेळा वर-खाली आणि नंतर उजवीकडे-डावीकडे हलवा. यानंतर उजवीकडून डावीकडे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 4 ते 6 वेळा

डोळे फिरवताना तळहाताच्या मधला भागाने काही वेळ डोळे झाकून ठेवा. असे केल्याने डोळ्यांचे स्नायू मजबूत राहतात.

कॉम्प्युटर किंवा लॅपटॉवर काम करत असताना, दर 10 मिनिटांनी किमान 20 फूट दूर पहा. यामुळे तुमच्या डोळ्यांची दूरची दृष्टी कायम राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT