Nail Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Nail Care Tips: नखांचा पिवळसरपणा कमी करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

तुमचे नख पिवळे आणि कोरडे झाले असेल तर तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

Nail Care Tips: नखं पिवळी पडणे किंवा त्यात भेगा दिसणे अजिबात चांगले दिसत नाही. कारण नखं हात आणि पायाचे सौंदर्य वाढवतात. पण, काही लोकांची नखे खूप कमकुवत होतात आणि वाढतात तशी तुटतात हे अनेक आजारांचे लक्षण असू शकते. पण नखं जर पिवळे किंवा कोरडे पडले असतील तर तुम्ही पुढील टिप्सचा वापर करू शकता.

  • या टिप्स वापरल्यास नखे चमकतील

यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडासा बेकिंग सोडा टाकावा. नंतर नखं 20 ते 25 मिनिटं पाण्यात बुडवून ठेवावे. त्यानंतर 20 ते 25 मिनिटांनी तुमचे हात पाण्यातून काढून कापसाच्या गोळ्यांनी स्वच्छ करावे. यामुळे तुमच्या नखांवर चमक येईल.

शॅम्पूचा वापर

नखांची काळजी घेण्यासाठी तुम्ही शॅम्पूच्या पाण्यात बोटं बुडवून ठेऊ शकता. यामुळे नखं स्वच्छ होतात आणि चमकदार देखील दिसतात.

  • नखांचा पिवळेपणा कसा कमी करावा

अनेक वेळा किचनमध्ये काम केल्यामुळे अनेक वेळा नखे ​​पिवळी दिसू लागतात. अशावेळी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात 1 ते 2 लिंबू पिळून त्यात हात 15 ते 20 मिनिटे बुडवून ठेवावे. यानंतर, आपले हात बाहेर काढावे आणि स्वच्छ पाण्याने धुवावे. नंतर नखांना थोडे क्रीम लावावे. यामुळे हातांचा पिवळेपणा कमी होईल.

  • नखांचा कोरडेपणा

शरीरात पाण्याची कमतरता असल्यास नखे कोरडी दिसू लागतात. याशिवाय त्यावर नियमितपणे तेल किंवा क्रिम लावावे, बदामचे तेल लावल्यास त्याचा अदिक फायदा होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT