Year End 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Year End 2023: 'या' गिनीज रेकॉर्ड्सनी वेधले सर्वांचे लक्ष

यंदा असे अनेक रेकॉर्ड बनवले गेले आहेत ज्यांचा समावेश गिनीज बुकमध्ये झाला आहे.

Puja Bonkile

Year End 2023: दरवर्षी असे रेकॉर्ड गिनीज बुकमध्ये नोंद केली जाते केले जे अनोखे असतात आणि हा ट्रेंड यावर्षीही कायम राहिला. यावेळी असे अनेक रेकॉर्ड बनवले गेले, ज्याबद्दल युजर्सही थक्क झाले आणि त्यामुळे त्यांच्याशी संबंधित व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. 2023 हे वर्ष काही दिवसांनी संपणार आहे. जाणून घेऊया अशाच 5 गिनीज रेकॉर्ड्सबद्दल ज्यांनी यावर्षी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • तिखट मिरची

या वर्षी जगातील तिखट मिरची कॅरोलिना रीपरचा मसालेदारपणाचा विक्रम मोडला. या मिरचीचे नाव Pepper X आहे आणि तिची मसालेदारता सरासरी 26.93 लाख Scoville Heat Units (SHU) आहे. SHU मिरचीचा तिखटपणा मोजतो.

  • ड्रेस केक

तुम्ही अनेक प्रकारचे केक पाहिले असतील पण या वर्षाच्या सुरुवातीला स्वित्झर्लंडमधील नताशा कॉलिन किम फाह ली फोकासने एक घालण्यायोग्य केक तयार केला होता. ज्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. तिने केकचा ड्रेस वधूचा गाऊन म्हणून डिझाइन केला आणि नंतर स्विस वर्ल्ड वेडिंग फेअरच्या फिनालेमध्ये तो स्वतः परिधान केला.

  • भारतीय मुलीची उत्तम कामगिरी

महाराष्ट्रातील 18 वर्षीय सृष्टी धर्मेंद्र शर्मा हिने 51 रॉड्सखाली 6.94 सेकंदात लिंबो स्केटिंग करत 50 मीटरपेक्षा जास्त वेगवान वेळ मारण्याचा विक्रम केला. तिने जमिनीपासून 30 सेंमी वर आडव्या ठेवलेल्या 51 रॉड्सखाली हात न लावता, पाय पसरून स्केटिंग केल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. तिच्या अद्भुत प्रतिभेमुळे तिला स्केटिंगची राणी असेही संबोधले जात आहे.

  • 14 सेकंदात फेटा बांधला

यावर्षी फेटा बांधण्याचा अनोखा विक्रमही अनेकांचे लक्ष वेधून घेतला. हा विक्रम आदित्य पाचोली नावाच्या व्यक्तीने केला आहे. त्याने अवघ्या 14.12 सेकंदात एवढ्या अचूकतेने दुस-या व्यक्तीला फेटा बांधला आहे. खरं तर फेटा बांधण्यासाठी संयम आणि सराव आवश्यक असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT