Weight Loss Diet Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Weight Control: असे डाएटिंग करत असाल तर आरोग्यावर होतील चूकीचे परिणाम!

Weight Control: शरीराला आवश्यक तेवढे अन्न न खाल्ल्यास शरीरात ऊर्जेची मोठी कमतरता भासते आणि दैनंदिन जीवनातील सामान्य कामे करण्यात अडचणी येतात.

दैनिक गोमन्तक

Weight Control: आज आपल्यापैकी अनेकजण वाढत्या वजनाने त्रस्त असल्याचे दिसून येते. आपण सुंदर दिसावे यासाठी अनेकजण प्रयत्न करताना दिसतात. वजन कमी करण्यासाठी डाएटिंगचादेखील आधार घेतला जातो. महत्वाचे म्हणजे, कोणत्याही तज्ञांच्या सल्ल्याशिवाय फक्त जेवण करणे कमी केल्यामुळे त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. चला तर जाणून घेऊयात चूकीच्या पद्धतीने डाएटिंग केल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात.

पचनक्रियेवर वाईट परिणाम

निर्धारित मर्यादेपेक्षा कमी खाल्ले तर त्याचा आपल्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. डाएटिंगमुळे शरीरात फायबरची कमतरता होते आणि अनेक महत्त्वाचे पोषक घटकही मिळत नाहीत, ज्यामुळे पचनसंस्था कमकुवत होते.

चयापचय कमजोर होईल

आपल्या शरिरासाठी पुरेसे अन्न खाणे महत्वाचे आहे. तसेच, नियमित अंतराने निरोगी अन्न खाणे सुरू ठेवणेदेखील गरजेचे असते. नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण कधीही टाळू नका.

अशक्तपणा

शरीराला आवश्यक तेवढे अन्न न खाल्ल्यास शरीरात ऊर्जेची मोठी कमतरता भासते आणि दैनंदिन जीवनातील सामान्य कामे करण्यात अडचणी येतात. तुमचे शरीर बारीक होण्याऐवजी कमकुवत होऊ लागेल, ज्यामुळे तुम्हाला चिडचिड देखील होऊ शकते.

पित्ताशयातील खडे

जे लोक वजन कमी करण्यासाठी कमी खाण्यास सुरुवात करतात, त्यांच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण कमी होऊ लागते, जर त्यांनी असे दीर्घकाळ केले तर पित्ताशयात खडे होण्याचा धोका वाढतो.

वजन कमी करण्यासाठी हे करा

वजन कमी करण्यासाठी जेवण न करणे हा कधीही योग्य पर्याय असू शकत नाही. त्यामुळे तज्ञांच्या मदतीने डाएटिंगला सुरुवात करा. याबरोबरच, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा कोणत्या कारणांमुळे तुमचे वजन वाढत आहे. त्यामध्ये अनेक कारणांचा समावेश असतो.

१. बैठे काम-

जर तुमच्या कामाचे स्वरुप बैठे असेल आणि तुम्ही एकाच ठिकाणी ८-९ तास बसत असाल तर तुमचे वजन वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी अधूनमधून ब्रेक घेणे महत्वाचे ठरते.

२. मानसिक स्वास्थ-

शारिरिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी किंवा वजन नियंत्रणात राहण्यासाठी तुमचे मानसिक स्वास्थ उत्तम राहणे महत्वाचे आहे. तुमचे मानसिक आरोग्य उत्तम असेल तर इतर गोष्टीही सोप्या होतात.

३. व्यायाम-

कितीही व्यस्त जीवनक्रम असला तरीही स्वत:ला वेळ देणे महत्वाचे आहे. दिवसातील १५ ते २० मिनिटे व्यायाम करणे गरजेचे असते.

४. खाणे

जेवण कमी करण्यापेक्षा तुम्ही जेवणात काय खात आहात ते पाहणेदेखील महत्वाचे आहे. सतत फास्टफूड, तेलकट पदार्थ आणि मोठ्या प्रमाणात गोड पदार्थ खात असाल तर तुमचे वजन नियंत्रणाबाहेर जाते. त्यामुळे संतुलित आहार घेण्यावर भर द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT