World Hindi Day 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Hindi Day: आजचा जागतिक हिंदी दिवस, जाणून घ्या 'या' दिवसाचे वेगळेपण

World Hindi Day 2023: हिंदी ही एक इंडो-आर्यन भाषा आहे जी जगभरातील 26 कोटींहून अधिक लोक बोलतात.

दैनिक गोमन्तक

World Hindi Day: जगभरात आज 'जागतिक हिंदी दिवस' साजरा करत आहे. जगभरात हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 10 जानेवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो. त्यासाठी निबंध स्पर्धांसह अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. 'मातृभाषेचे महत्त्व न विसरता हिंदी ही जनमताची भाषा बनवणे' ही यंदाच्या हिंदी दिनाची थीम आहे.

हिंदी ही एक इंडो-आर्यन भाषा आहे. जी जगभरातील 260 दशलक्षाहून अधिक लोक बोलतात. ही जगातील चौथी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ही भारत सरकारची अधिकृत भाषा आहे आणि इंग्रजीसह भारताच्या (India) दोन अधिकृत भाषांपैकी एक आहे.

  • या दिवसाचा इतिहास काय आहे?

1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी पहिल्या जागतिक हिंदी परिषदेचे उद्घाटन केले. तेव्हापासून भारत, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, युनायटेड किंगडम, मॉरिशस, त्रिनिदाद आणि टोबॅगोसह विविध देशांमध्ये जागतिक हिंदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

10 जानेवारी 2006 रोजी पहिल्यांदा जागतिक हिंदी दिवस साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिन साजरा केला जाऊ लागला.

हिंदी भाषेच्या संवर्धनाच्या उद्देशाने दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय हिंदी दिनाचे आयोजन केले जाते. अनेकदा लोकांमध्ये या दोन दिवसांबद्दल संभ्रम असतो.

राष्ट्रीय हिंदी दिवस 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो तर 10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिन आयोजित केला जातो. जागतिक हिंदी दिन भाषेच्या जागतिक संवर्धनावर लक्ष केंद्रित करतो, तर हिंदी दिवस विशेषत: भारतात हिंदीला मान्यता देण्यावर लक्ष केंद्रित करतो.

स्वातंत्र्यानंतर विविधतेने भरलेल्या देशाला एकत्र आणण्यासाठी एक भाषा निवडणे अवघड होते. देशात अनेक भाषा आणि बोली होत्या, त्यामुळे अनेक विचारांनंतर नवीन राष्ट्राच्या भाषा म्हणून हिंदी आणि इंग्रजीची निवड करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT