World Food Safety Day 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Food Safety Day 2022: खाण्याच्या 'या' 6 चांगल्या सवयी ठेवा लक्षात

Good Habits: हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना खाण्यापिण्याच्या स्वच्छतेबद्दल सांगणे हा आहे.

दैनिक गोमन्तक

दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिन 7 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक अन्न (Healthy Food) खाण्याबद्दल जागृत करण्यासाठी साजरा केला जातो. (World Food Safety Day 2022 News)

हा दिवस 2019 मध्ये संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केला होता. दरवर्षी जगभरात 600 दशलक्ष लोक खराब अन्न खाल्ल्यामुळे आजारी पडतात. यामुळे लोकांना खाण्याच्या चांगल्या सवयींबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. चला तर मग जाणुन घेऊया खाण्याच्या चांगल्या सवयीं कोणत्या असायला पाहिजे.

  • काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.

  • बाहेरून आनलेल्या भाज्या, चिकन, मांस, धान्ये इत्यादी व्यवस्थित स्वच्छ धुवून खा.

  • याशिवाय तुम्ही ज्या भांड्यांमध्ये अन्न घेत आहात, ती भांडी स्वच्छ आहेत याची काळजी घ्यावी.

  • झुरळ, माश्या, मुंग्या इत्यादी भांड्यांमध्ये धोकादायक जीवाणू पसरवू शकतात.

  • कच्चे आणि शिजवलेले पदार्थ नेहमी वेगळे ठेवावे.

  • शिजवलेले अन्न कच्च्या पदार्थांसोबत ठेवू नये कारण त्यात बॅक्टेरिया फार लवकर वाढु शकतात, त्यामुळे शिजवलेले अन्न खराब होऊ शकते.

  • कमी शिजलेले अन्न खाऊ नये. अन्न नेहमी चांगले शिजवा आणि तेच खा.

  • अन्न (Food) शिजवतांना स्वच्छ पाणी आणि योग्य घटकांचा वापर करावा.

  • स्वयंपाक आणि पिण्यासाठी नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर करावा.

  • यासारख्या गोष्टी लक्षात ठेवल्यास आरोग्य निरोगी (Healthy) ठेवण्यास मदत मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT