Women Heath Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Women Heath Care: मासिक पाळीत थकवा येतो? मग लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' 6 बदल

महिलांना मासिक पाळी दरम्याने अनेक शारिरिरक समस्यांना सामोरे लागते.तसेच थकवा खुप जाणवतो. यासाठी महिलांना काय करावे हा जाणून घेऊया.

Puja Bonkile

महिलांना मासिक पाळी दरम्याने अनेक शारिरिरक समस्यांना सामोरे लागते. तसेच या दरम्यान थकवा खुप जाणवतो. मासिक पाळीतील रक्तस्त्रावामुळे अनेक पोषक घटकांची कमतरता जाणवते. यामुळे अशक्तपणा येणे, हिमोग्लोबिन कमी होणे यासाराख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे महिलांनी मासिक पाळी दरम्यान आराम करणे, योग्य पोषक आहार घेणे, स्ट्रेस घेऊ नये. या दिवसांमधला थकवा दूर करण्यासाठी तुम्ही लाइफस्टाइलमध्ये काही बदल करून ही समस्या कमी करू शकता.

Healthy Food

पोषक आहार

मासिक पाळी दरम्यान पोषक आहार घेणे गरजेचे असते. लोह आणि व्हिटॅमिन बी १२ युक्त पदार्थांचे सेवन करावे. पालक, बीट,चवळी, अक्रोड आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे.

Drinking Water

भरपुर पाणी प्यावे

या दिवसांमध्ये हायड्रेटड राहिल्याने शरीराचा थकवा कमी होतो. दिवसभर ६-७ लिटर पाणी प्यावे. पाणी प्यायल्याने शरीरातील घटकांचा समतोल राखला जातो आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते. त्यामुळे थकवा दूर करण्यासाठी पाणी भरपुर प्यावे.

yoga
  • योगा करावा

मासिक पाळी दरम्यान हलका आणि नियमित योगा करावा. योगा किंवा स्ट्रेचिंगमुळे थकवा कमी करू शकतो. योगामुळे शरीराचे स्नायू मोकळे होतात. मन शांत राहते. यामुळे क्रॅम्प आणि वेदन देखील कमी होतात.

sleep
  • चांगली झोप

चांगली झोप अनेक आजार दूर ठेवू शकते. यामुळे मासिक पाळीत देखील पुरेशी झोप घेणे गरजेचे असते. या दिवसांमध्ये शरीराला आराम मिळणे गरजेचे असते. चांगली झोप हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करते. यामुळे तणाव कमी होतो.तसेच चांगली झोप घेतल्याने मासिक पाळीत होणाऱ्या वेदना कमी होतात.

stress
  • स्ट्रेस घेऊ नये

अनेक महिला छोट्या गोष्टींचे देखील स्ट्रेस घेतात. मासिक पाळीत स्ट्रेस घेऊ नये. कारण यामुळे या दिवसांमधील वेदना अधिक वाढतात. या वेदना कमी करण्यासाठी ध्यान करावे. आवडते गाणं ऐकावे. यामुळे स्ट्रेस कमी होण्यास मदत मिळते.

Coffee
  • कॉफीचे सेवन टाळावे

मासिक पाळी दरम्यान महिलांनी कॉफीचे सेवन टाळावे.यामुळे थकवा जास्त जाणवू शकतो. कॅफिन महिलांमध्ये प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम चा लक्षण वाढवू शकतो. यामुळे इतर अनेक समस्या वाढू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT