Winter Foot Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Foot Care: हिवाळ्यात तळपाय राहतील मुलायम, फक्त वापरा 'या' गोष्टी

हिवाळ्यात तळपायांना मुलायम ठेवायचे असेल तर काळजी घेणे देखील गरजेचे आहे.

Puja Bonkile

Winter Foot Care: हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण जॅकेट आणि स्वेटर घालतात. परंतु तरीही थंडीपासून बचाव होऊ शकत नाही. या थंडीच्या दिवसात त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कारण थंडीचा थेट परिणाम त्वचेवर होतो. या थंडीच्या दिवसात त्वचा खूप कोरडी होते. त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी लोक विविध प्रकारच्या स्किन केअर प्रोडक्ट्सचा वापर करतात. लोक चेहऱ्याची आणि हाताची काळजी घेतात, पण पायांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे पाय अधिक कोरडे पडतात. पण तुम्ही घरगुती उपाय करून हिवाळ्यात पायांना मुलायम ठेऊ शकता.

पेट्रोलियम जेली

जर तुमचे पाय खूप कोरडे होत असतील आणि तुमच्याकडे पायाची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ नसेल, तर त्यासाठी पेट्रोलियम जेली हा एक चांगला पर्याय आहे. पेट्रोलियम जेली वापरून तुम्ही तुमचे पाय सहज मऊ ठेऊ शकता. तुम्हाला बाजारात सहज पेट्रोलियम जेली मिळेल. 

मध

मधामध्ये असे अनेक घटक असतात, जे त्वचेच्या कोरडेपणापासून आराम देतात. जर तुम्हाला मध वापरायचे असेल तर ते 10 ते 15 मिनिटे पायांवर लावा आणि नंतर कोमट पाण्याने पाय स्वच्छ करा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 

कोरफड

कोरफडचा वापर आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. तसेच कोरफड तळपायांसाठी देखील उपयुक्त आहे. तुम्ही बाजारात मिळणारे कोरफड जेल किंवा घरी कोरफडचे झाड असेल तर त्याचा गर काढून तळपायाला लावू शकता. यामुळे थंडीच्या दिवसात देखील तळपाय मुलायम राहतील.

कोकनट ऑइल

हिवाळ्यात तळपायांना मुलायम ठेवण्यासाठी स्वस्तातला उपाय शोधत असाल तर तुम्ही कोकनट ऑइल वापरू शकता. झोपतांना तळपायांना कोकनट ऑइल लावावे. नंतर पायात मोजे घालावे. यामुळे बेडशीट खराब होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT